Crop Crisis: धरणाच्या भरवशावरील पिके करपली! जलसंपदाच्या नियोजनाअभावी पिके वाया जाण्याच्या स्थितीत

Waki-Khapri Dam, which has become dry due to erosion, in the second picture, Tanaji Mande showing the crop that has withered due to lack of water.
Waki-Khapri Dam, which has become dry due to erosion, in the second picture, Tanaji Mande showing the crop that has withered due to lack of water.esakal

Crop Crisis : वाकी-खापरी धरण दुरुस्तीच्या नावाखाली गेल्या तीन वर्षापासून पाण्याच्या विसर्गामुळे परिसरातील शेतकरी त्रस्त आहे. फुलकळ्यांवर आलेले बागायती क्षेत्र पाण्यावाचून अक्षरशः डोळ्यादेखत सुकून चालले आहे.

स्थानिक शेतकऱ्यांना किमान सहा टक्के पाणीसाठा शिल्लक ठेवावा असा नियम असताना तेही पाणी आता शिल्ल्क नाही. त्यामुळे जमिनी जाऊनही येथील शेतकरी पाण्याअभावी पिके वाया जाताना पाहत आहे. (case of crop loss due to lack of water resources planning at ghoti nashik news)

तालुक्यातील शेतकऱ्यांनी विकास कामांना जमिनी दिल्या, मात्र उर्वरित जमिनीसाठी भविष्यात सिंचनाचे असे हाल होतील हे मात्र त्यांना अपेक्षित नव्हते. ना लोकप्रतिनिधी ना शासन याकडे लक्ष द्यायला तयार आहे.

दरवर्षी धरणातील विसर्गामुळे ही अवस्था होत असूनही त्याकडे लक्ष द्यायला कुणीही तयार नाही, त्यामुळे नवीन प्रकल्पासाठी भविष्यात भूसंपादन करताना विविध समस्यांचा सामना करावा लागणार आहे.

सध्या धरणातील विसर्गामुळे नदीपात्रातील पाणी कमी झाले आहे. पंधरा दिवसांत तेही संपणार आहे. यामुळे धरणाच्या लाभ क्षेत्रातील व खालील नदी पात्रालगतचे शेतकरी हवालदिल झाले आहेत. जलसंपदा विभागाच्या कामाबाबत शेतकऱ्यांनी नाराजी व्यक्त केली आहे.

हेही वाचा : Credit Card फसवणूक....काय घ्याल काळजी?

Waki-Khapri Dam, which has become dry due to erosion, in the second picture, Tanaji Mande showing the crop that has withered due to lack of water.
Malegaon Bazar Samiti : मालेगाव बाजार समिती सभापतीपदी हिरे निश्‍चित! 25 मेस मतदान

स्थानिक शेतकऱ्यांना सहा टक्के पाणीसाठा शिल्लक ठेवायला हवा असताना धरणात केवळ मृतसाठा शिल्लक राहिला आहे. बागायती पिकांसाठी लाखो रुपयांचे भागभांडवल खर्च करूनही ऐनवेळी पाणीसाठा कमी झाल्याने लाखोंचा खर्च वाया जाणार आहे.

विशेष म्हणजे धरणालगतच्या गावांत पाणीटंचाई सदृश परिस्थिती निर्माण होणार आहे. एकीकडे बागायती पिकांचे घसरलेले दर तर दुसरीकडे पाण्याची झालेली वाताहात, अवकाळीचे संकट यामुळे शेतकरी बेजार झाला आहे. त्याला या पिकांच्या उत्पन्नाची अपेक्षा होती,मात्र ती आता फोल ठरणार आहे.

धरण क्षेत्रातील अनेक केटीवेअर कोरडेठाक पडले आहे. भावली, कडवा, त्रिंगलवाडी धरण परिसरात देखील अशीच परिस्थिती निर्माण झाल्याने हजारो हेक्टरवरील पिके वाया जाण्याची भीती आहे. पिंपळगाव भटाटा, कोरपगाव, वाकी, भावली, वाळविहीर या गावांसह नदीकाठच्या असंख्य गावांनाही हा प्रश्न भेडसावणारा आहे.

"धरणात पाणीसाठ्याच्या भरवशावर घेतलेली व सध्या फुलकळ्यांवर आलेली पिके परिसरात पाण्यावाचून सुकून चालली आहे. दुरुस्तीच्या नावाखाली औद्योगिक क्षेत्र, इतर जिल्ह्यातील शेतकरी जगवायचा आणि ज्याने जागा दिली त्याला पाण्यावाचून ठार मारायचे हे शासनाचे विसंगती धोरण शेतकऱ्यांच्या मुळावर उठले आहे. जलसंपदा विभागाने लक्ष घालत शिल्लक पाणीसाठा जतनासाठी प्रयत्न करावा." - संजय शिंदे, शेतकरी, भावली.

Waki-Khapri Dam, which has become dry due to erosion, in the second picture, Tanaji Mande showing the crop that has withered due to lack of water.
Brinjal Crop Crisis : वांग्याचे 15 गुठ्यातील पीक उपटले! उत्पादन खर्चही निघत नसल्याने शेतकरी निराश

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com