Nashik Crime News : कार पंक्चर करून साडेसात लाखांची रोकड लांबविली | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Crime News

Nashik Crime News : कार पंक्चर करून साडेसात लाखांची रोकड लांबविली

नाशिक : गडकरी सिग्नलकडे जात असताना कार पंक्चर झाली. त्यामुळे डिक्कीतून स्टेफनी काढून टायर बदलत असताना अज्ञात चोरट्याने कारमधील ७ लाख ७३ हजारांची रोकड असलेली बॅगच लंपास केल्याचा प्रकार घडला. गेल्या सोमवारी रात्री घडलेल्या या प्रकरणी मुंबई नाका पोलिसात चोरीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. (case of seven half lakh stolen from car Nashik Crime News)

हेही वाचा : असं एक गाव, जिथं जमिनीला कान लावला तरी संगीत ऐकू येतं...

हेही वाचा: Nashik Crime News : दांपत्याच्या आत्महत्याप्रकरणी मनियार, बैरागीविरोधात गुन्हा दाखल

देवीसिंग जिवाराम पुरोहित (रा. गिल्स रेसीडेन्सी, आनंदवल्ली, पाईपलाईन, गंगापूर रोड) यांच्या फिर्यादीनुसार, ते गेल्या सोमवारी (ता. १९) रात्री साडेनऊ वाजेच्या सुमारास त्याचे जीजा कृष्णा पुरोहित यांच्यासमवेत घरी जाण्यासाठी क्रेटा कारने (एमएच १५ एचएम १४५३) निघाले. गडकरी सिग्नलच्या दिशेने ते जात असतानाच शिंगाडा तलाव रस्त्यावरील युनिक मोटर्स दुकानासमोरच त्यांच्या कारचे टायर पंक्चर झाले.

त्यामुळे देवीसिंग व त्यांचे जिजा कृष्णा हे दोघेही कारमधून उतरले आणि डिक्कीतून त्यांनी स्टेफनी काढली. त्यानंतर ते कारचे टायर बदलत होते. या दरम्यान अज्ञात चोरट्याने त्यांच्या कारचा दरवाजा उघडून कारच्या सीटवर ठेवलेली काळी बॅग, ज्यात ७ लाख ७० हजार ४०० रुपयांची रोकड, ३ हजारांचे ॲपलचे ॲडप्टर असे ७ लाख ७३ लाख ४०० रुपयांचा ऐवज चोरून नेला.

याप्रकरणी मुंबई नाका पोलिसात चोरीचा गुन्हा दाखल करण्यात आला असून, हवालदार टेमगर हे पुढील तपास करीत आहेत. दरम्यान, सदरचा प्रकार चोरट्यांनी रेकी करून केला असल्याची शक्यता पोलिसांनी व्यक्त केली आहे. यामार्गावरील सीसीटीव्ही पोलीस तपास आहेत. त्यातून चोरट्यांची माहिती मिळण्याची शक्यता आहे.

हेही वाचा: Nashik Political News: शिंदे गटाचे शिष्टमंडळ आयुक्तांच्या दारी; अवाजवी मालमत्ता कर कमी करण्याची मागणी