Nashik Bribe Crime : चांदवड येथे लाचखोराविरोधात गुन्हा दाखल | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Bribe crime

Nashik Bribe Crime : चांदवड येथे लाचखोराविरोधात गुन्हा दाखल

नाशिक : जमिनीच्या सातबारा उताऱ्यावर नाव लावण्यासाठी चांदवड तलाठी कार्यालयातील खासगी कामगार मदतनीसास लाचेची मागणी केल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. रवींद्र कारभारी मोरे (४२, रा. पाथरथेंबे, हिवरखेडे, ता. चांदवड) असे लाचखोराचे नाव आहे. (case registered against talathi worker for taking bribe in Chandwad Nashik Bribe Crime)

हेही वाचा : अल्पमतातील निवाडे आणि सामान्य माणूस

तक्रारदाराच्या तक्रारीनुसार, त्यांचा कांदा खरेदी-विक्रीचा व्यवसाय आहे. तक्रारदाराने वडिलांच्या नावे ५० गुंठे जमिन विकत घेतली. या जमिनीच्या सातबाऱ्यावर वडिलांचे नाव लावून देण्याच्या मोबदल्यात लाचखोर मोरे याने हॉटेलमध्ये झालेल्या पार्टीचे २ हजार ९४० रुपयांचे बिल बक्षीस स्वरुपात लाचेची मागणी गेल्या ७ जानेवारी रोजी केली होती.

याप्रकरणी तक्रारदाराने लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे तक्रार केली. त्यानुसार, पथकाने शहानिशा केल्यानंतर, याप्रकरणी चांदवड पोलिसात लाचखोर मोरे विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

सदरची कारवाई, लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या अधीक्षक शर्मिष्ठा घारगे-वालावलकर, अपर अधीक्षक नारायण न्याहाळदे, उपअधीक्षक नरेंद्र पवार यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक संदीप घुगे, हवालदार एकनाथ बावीस्कर, प्रकाश महाजन, नितीन नेटारे, परशुराम जाधव यांच्या पथकाने केली.

टॅग्स :Nashikbribe crime