Nashik Crime News : पोलिस धमकीप्रकरणी गुन्हा दाखल होताच जुन्या तक्रारदारांनाही कारवाईची अपेक्षा

Crime News
Crime Newsesakal

नाशिक : अवैध सावकारांवर छापे टाकताना सुरक्षेसाठी आलेल्या पोलिसांना धमकी दिल्याप्रकरणी सातपूर पोलिसांनी बुधवारी (ता. ८) तक्रार दाखल केल्यानंतर गुरुवारी (ता. ९) अनेक जुन्या तक्रारदार पुन्हा पुढे आले.

त्यांनी संबंधितांविरोधात तक्रार देऊनही सातपूरचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक कारवाई करत नसल्याची खंत व्यक्त करत आता तरी आमच्याही तक्रारीची दखल घेत सातपूर पोलिसांनी कारवाई करावी, अशी मागणी करताना दिसून आले. (case registered in case of police intimidation old complainant also expect for action Nashik Crime News)

सातपूर औद्योगिक कामगार वसाहतीत शिरोडे कुटुंबातील तिहीरी आत्महत्या प्रकरणानंतर शहरात विविध अवैध सावकारांच्या तक्रारीचे आव्हान पोलिस आयुक्त अंकुश शिंदे यांनी करताच अनेक तक्रारदार पुढे येत आहेत.

सातपूरमधील दोन सावकार बंधूंवर सहकार विभागाने छापा टाकताना या पथकाबरोबर संरक्षणासाठी आलेल्या पोलिसांनाच धमक्या दिल्याचा प्रकार समोर आला आहे. विशेष म्हणजे सरकारी कामात अडथळा निर्माण करून तसेच थेट पोलिस कर्मचारीलाच धमकी दिली.

संबंधित शिवसेना पदाधिकारी व ठेकेदार तथा अवैध सावकाराविरोधात मात्र सातपूर पोलिस ठाण्यात तक्रार घेण्यास नकार देत त्याला वाचविण्यासाठी प्रयत्न केला गेला. एवढेच नव्हे तर उलट या कर्मचाऱ्याविरोधातच संबंधितांना तक्रार अर्ज करण्याचाही सल्ला दिला गेल्याच पोलिस कर्मचारी खासगीत चर्चा करीत होते.

हेही वाचा : संतुलित आहारातून रोखा फॅटी लिव्हरचा आजार

Crime News
BJP Statewide Meeting : विधानसभेसह स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांचा बिगूल

‘सकाळ’ने याबाबत आवाज उठवताच थेट पोलिस आयुक्तांनी दखल घेत सातपूरला संबंधिताविरोधात पोलिस कर्मचारीची तक्रार दाखल करण्याचे सूचित केले. आज दुसऱ्या दिवशी या अवैध सावकाराविरोधात जुने तक्रारदारही पुढे आले.

अनेक तक्रारी दाखल करूनही या अवैध सावकारांवर सातपूर पोलिस कारवाई करत नसल्याचे सागंत आता पोलिस आयुक्तांनी आमच्याही तक्रारीबाबत विचार करावा, अशी मागणी केली.

फक्त अदखलपात्र गुन्ह्याची नोंद...

सातपूर-सिडकोसह शहर परीसरात अवैध सावकारांचा व स्थानिक पोलिसांच साटेलोटे असल्याने अनेक तक्रारी दाखल केले जात नाही. एखाद्याने खूप वशिलाबाजी करून अर्ज दिला तर अदखलपात्र नोंद केली जाते. नेमका असा प्रकार सातपूरमध्ये मोठा प्रमाणावर होत असल्याचे तक्रारदार सागंतात.

Crime News
Dada Bhuse : जनसेवेचे साधन म्हणूनच नोकरीकडे पाहा : दादा भुसे

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com