esakal | कपडे काढो आंदोलन : जितेंद्र भावेंसह समर्थकांवर गुन्हे दाखल
sakal

बोलून बातमी शोधा

jitendra bhave arrested

कपडे काढो आंदोलन : जितेंद्र भावेंसह समर्थकांवर गुन्हे दाखल

sakal_logo
By
युनूस शेख

नाशिक : कोरोना प्रादुर्भाव (corona virus) वाढत असल्याने आंदोलन, तसेच गर्दी करण्यास प्रशासनाचे मनाई आदेश आहे. असे असताना भावे यांनी सार्वजनिक ठिकाणी कपडे काढून आंदोलन करत नियमांचे उल्लंघन केल्याने मुंबई नाका पोलिसांनी (mumbai naka police) कलम १८८ प्रमाणे गुन्हा दाखल केला आहे. तसेच त्यांच्या समर्थकांनी मोठ्या प्रमाणावर मुंबई नाका पोलिस ठाण्याबाहेर गर्दी करत भावे यांची सुटका करण्याची मागणी करत गोंधळ घातला. रात्री उशिरापर्यंत गोंधळ सुरू असल्याने परिसरात तणावाचे वातावरण होते. (cases-filed-against-Jitendra-Bhave-and-his-supporters)

जितेंद्र भावेंसह समर्थकांवर दोन विविध गुन्हे दाखल

कपडे काढो आंदोलनप्रकरणी जितेंद्र भावे यांच्यासह मुंबई नाका पोलिस ठाण्याबाहेर गर्दी केल्यामुळे समर्थकांवर असे दोन विविध प्रकारचे गुन्हे दाखल झाले आहेत.पोलिस उपायुक्त अमोल तांबे, सहाय्यक आयुक्त दीपाली खन्ना यांनी समर्थकांना समजावण्याचा प्रयत्न केला. तरीही आंदोलन सुरूच ठेवल्याने शीघ्रकृती दलाचे पथक आणि अतिरिक्त बंदोबस्त तैनात केला. रुग्णालय प्रशासन तक्रार दाखल करण्यासाठी आले नसल्याने भावे यांची पोलिसांनी सात तासांनंतर सुटका केली. बेकायदेशीररीत्या गर्दी जमा केल्याने विनायक येवले, अक्षदा घोडके यांच्यासह २० ते २५ समर्थकांवर गर्दी जमा केल्याप्रकरणी गुन्हा दाखल केल्याची माहिती वरिष्ठ निरीक्षक विजय ढमाळ यांनी दिली.