Latest Crime News | भर दिवसा गाडीची काच फोडून साडेतीन लाखांची रोकड लंपास | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

The thief was captured on CCTV camera while breaking the window of the Creta car and withdrawing the cash.

Nashik Crime News : भर दिवसा गाडीची काच फोडून साडेतीन लाखांची रोकड लंपास

लासलगाव (जि. नाशिक) : लासलगाव येथील कोटमगाव रस्त्यावरील योगेश कृषी सेवा केंद्राजवळ भरदिवसा मोटरसायकलवर आलेल्या दोन अनोळखी चोरट्यांनी क्रेटा कंपनीच्या गाडीची काच फोडून गाडीमध्ये ठेवलेली साडेतीन लाखांची रोकड लंपास केल्याची घटना गुरुवारी (ता.२०) दुपारी तीनच्या सुमारास घडली. (Cash of three half lakhs stolen by breaking glass of creta car in daytime nashik Latest Crime News)

हेही वाचा: Nashik : मनपा आयुक्तांवर फेकले गटारीचे पाणी; रास्तारोको आंदोलनावेळी नागरीकांचा संताप

पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार रुई येथील शेतकरी ज्ञानेश्वर दौलत तासकर यांनी गुरुवारी (ता.२०) दुपारी दोनच्या सुमारास लासलगाव येथील एचडीएफसी बॅंकेमधून चार लाख रुपये काढून क्रेटा गाडी घेऊन कोटमगाव रस्त्यावरील योगेश कृषी केंद्रामध्ये शेती औषधे घेण्याकरता गेले, त्यांनी क्रेटा गाडी कृषी सेवा केंद्राच्या बाजूला लाऊन पन्नास हजार रुपयांसोबत घेऊन दुकानात गेले.

शेती औषधे घेऊन गाडीजवळ आले असता सीसीटीवी कॅमेरात कैद तोंडाला मास्क लावलेल्या मोटारसायकलस्वाराने क्रेटा गाडीच्या ड्रायव्हर सीट शेजारील काच फोडून गाडीच्या डॅशबोर्डच्या ड्रावरमध्ये कापडी पिशवीत ठेवलेले साडे तीन लाख रुपये लंपास केल्‍याचे तासकर यांना निदर्शनास आले. ज्ञानेश्वर तासकर यांनी तातडीने लासलगाव पोलिसांशी संपर्क साधत घटनेची माहिती कळविली. लासलगाव पोलिस ठाण्यात चोरट्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सहाय्यक पोलिस निरीक्षक राहुल वाघ यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस तपास कर्मचारी करत आहे.

हेही वाचा: Nashik : बिजोरसे- नामपूर रस्त्याची दैना; काटेरी बाभळींमुळे साईडपट्ट्याही लुप्त