टुडे ३ ॲंकर
ॲंकर
NSK26H35261
पाळधी : शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांना अभिवादन करताना पालकमंत्री गुलाबराव पाटील व पदाधिकारी.
--
शंभर जणांच्या डोळ्यांत प्रकाश फुलविण्याचा उपक्रम
पालकमंत्र्यांकडून बाळासाहेबांना अभिवादन; मोतीबिंदू शस्त्रक्रियेसाठी पनवेलकडे रवाना
सकाळ वृत्तसेवा
पाळधी (ता. धरणगाव), ता. १७ : हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे यांच्या स्मृतींना अभिवादन करत सामाजिक बांधिलकीचा अनोखा संदेश देण्यात आला. मंत्री गुलाबराव पाटील यांच्या हस्ते बाळासाहेबांच्या प्रतिमेचे पूजन करून अभिवादन करण्यात आले. याच कार्यक्रमाचे औचित्य साधून मोतीबिंदूचा त्रास असलेल्या १०० गरजू रुग्णांना शस्त्रक्रियेसाठी पनवेल येथील शंकरा आय हॉस्पिटलकडे रवाना करण्यात आले. पाळधी येथील शासकीय विश्रामगृहात हा कार्यक्रम झाला.
स्व. बाळासाहेब ठाकरे यांच्या प्रतिमेचे पूजन करून मंत्री गुलाबराव पाटील यांनी अभिवादन केले. यावेळी उपस्थित शिवसैनिकांनीही बाळासाहेबांच्या स्मृतींना उजाळा दिला. त्यानंतर मोतीबिंदू रुग्णांना उपचारासाठी पनवेलकडे रवाना करण्यात आले.
ग्रामीण भागातील अनेक ज्येष्ठ नागरिक आणि गरजू रुग्णांना मोतीबिंदूमुळे दृष्टीच्या समस्यांना सामोरे जावे लागते. आर्थिक परिस्थितीमुळे अनेकदा वेळेवर शस्त्रक्रिया करणे शक्य होत नाही. अशा रुग्णांना मोफत अथवा सुलभ उपचारांची संधी उपलब्ध व्हावी, या सामाजिक दृष्टिकोनातून नेत्रसेवेचा हा उपक्रम राबविण्यात येत आहे. पनवेल येथील शंकरा आय हॉस्पिटलमध्ये या १०० रुग्णांची पुढील तपासणी करून आवश्यकतेनुसार मोतीबिंदू शस्त्रक्रिया करण्यात येणार आहे.
याप्रसंगी माजी सभापती मुकुंदराव नन्नवरे, राजू चव्हाण, पाळधी बुद्रुकचे लोकनियुक्त सरपंच विजू पाटील यांच्यासह समस्त जीपीएस मित्र परिवार शिवसैनिक, पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.