दुष्काळामुळे गो-शाळांना प्रति पशू १०० रुपये चारा अनुदान द्यावे

दुष्काळामुळे गो-शाळांना प्रति पशू १०० रुपये चारा अनुदान द्यावे
Published on: 
फोटो : NSK26H34345 नंदुरबार : गो- शाळांमधील पशुंना चारा उपलब्ध करून द्यावा, या मागणीसाठी जिल्हाधिकारी कार्यालयाबाहेर निदर्शने करताना गोशाळा महासंघाचे भरत गावित, आकाश जैन यांच्यासह पदाधिकारी. ------------------- गो- शाळांना प्रतिपशू प्रतिदिन चारा अनुदान द्यावे महासंघासह पशुपालकांची निवासी उपजिल्हाधिकाऱ्यांकडे मागणी सकाळ वृत्तसेवा नंदुरबार, ता. २ : दुष्काळामुळे राज्यातील गो- शाळांसह शेतकऱ्यांकडे असलेल्या पशुधनासाठी प्रतिपशू प्रतिदिन १०० रूपये अनुदान द्यावे, या मागणीचे निवेदन गोशाळा महासंघातर्फे निवासी उपजिल्हाधिकारी आशा संघवी यांना देण्यात आले. या वेळी पदाधिकाऱ्यांनी जिल्हाधिकारी कार्यालयाबाहेर निदर्शने करून प्रशासनाचे मागण्यांकडे लक्ष वेधले. राज्यात नोंदणीकृत १०१४ गोशाळा आहेत. दुष्काळामुळे गोशाळांमधील पशुधनाच्या चारा पाण्याचा प्रश्‍न निर्माण झाला आहे. यासाठी प्रतिदिन प्रतिपशु १०० रुपये याप्रमाणे अनुदान द्यावे. शासनाने दुष्काळ जाहीर केला आहे. अशा परिस्थितीत गोशाळा व शेतकऱ्यांकडील पशुधनाची परिस्थिती विदारक आहे. पाऊस कमी झाल्याने शेतात पशुंसाठी चारा, कडबा व कुटार उपलब्ध नाही. पडीत जमीन, डोंगर व जंगलात हिरवा चारा उपलब्ध नाही. परिणामी, चाऱ्याचे भाव गगनाला भिडले आहेत. चाऱ्याचा साठा शासनाकडे उपलब्ध दिसत नाही. त्यामुळे पशुंच्या चाऱ्यासंदर्भात मोठी समस्या भविष्यात निर्माण होणार आहे. पाऊस अत्यंत कमी झाल्याने विहीर, बोअर, तलाव, धरणे यांची जलपातळी खालावली आहे यामुळे भविष्यात गोशाळेतील पशूना व पशुपालकांना टँकरने पाणी पाजण्याची वेळ येऊ शकते. महाराष्ट्र सरकारने पशुपालकांसाठी ग्रामपंचायत स्तरावर प्रत्येक गावात चारा डेपो निर्माण करावा. दुष्काळ परिस्थितीत शेतकरी मोठ्या प्रमाणात त्यांच्याकडील पशुधन गोशाळेत आणून देत आहेत. त्या पशुधनाचा स्वीकार गोशाळा करीत आहे. मात्र गोशाळेत क्षमतेपेक्षा जास्त गोवंश झाल्याने त्यांच्या चाऱ्याची चिंता वाढली आहे. काही शेतकरी चाऱ्याअभावी आपला गोवंश विक्री करीत आहेत तर काही विक्री करण्याच्या तयारीत आहेत. या परिस्थितीत गोवंश कत्तलीसाठी जाणार नाहीत, याची काळजी घेण्याची गरज आहे. गोशाळा महासंघातर्फे जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष भरत गावित यांच्या नेतृत्वाखाली हे निवेदन देण्यात आले. या वेळी आकाश जैन, मदन महाले, राजेंद्र जाधव, अभिमन्यू चव्हाण, गौतम जैन, विनोद जैन, दीपक मराठे यांच्यासह पदाधिकारी उपस्थित होते.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.