गुरांच्या बाजाराला पाल येथे सुरुवात

गुरांच्या बाजाराला पाल येथे सुरुवात
Published on: 
RV126B08671 पाल (ता.रावेर) : येथील उपबाजार समितीत गुरांचा बाजार सुरू झाल्याबद्दल पशुपालकांचा सत्कार करताना बाजार समितीचे सचिव कमलेश पाटील, संचालक सिकंदर तडवी, उपसंचालक संतोष तायडे आदी. ---------- गुरांच्या बाजाराला पाल येथे सुरुवात ---------- पशुपालकांचा सत्कार; पहिल्याच दिवशी आठ गुरांची विक्री सकाळ वृत्तसेवा रावेर, ता.६ : रावेर कृषी उत्पन्न बाजार समितीअंतर्गत तालुक्यातील पाल येथील उपबाजार समितीत मंगळवार (ता.६)पासून गुरांच्या बाजारास सुरुवात झाली. त्यानुसार आज पहिल्याच दिवशी विक्रीसाठी आलेल्या २२पैकी आठ गुरांची विक्री झाली. दर मंगळवारी पाल येथे आठवडे बाजार भरतो. त्याअनुषंघाने रावेर कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती प्रल्हाद पाटील व संचालक मंडळाने पाल येथील उपबाजार समितीत गुरांचा बाजार सुरू करण्याचा निर्णय घेतला. त्यानुसार मंगळवारपासून गुरांच्या बाजारास सुरुवात झाली. पहिल्याच दिवशी २२ गुरे विक्रीसाठी आले होते. त्यापैकी आठ गुरांची विक्री झाली. याप्रसंगी पशुपालकांचा सत्कार बाजार समितीचे संचालक सिकंदर तडवी, सचिव कमलेश पाटील यांनी केला. सत्कार करण्यात आलेल्यांमध्ये सईद शहा (रा.पाल), शेख अजीज (रा.रसलपुर) व इतरांचा समावेश आहे. यावेळी उपसचिव संतोष तायडे, सुपरवायझर किरण पाटील, विजय महाजन यांच्यासह नागरिक उपस्थित होते.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com