नाशिक: स्मार्ट रोडवरील सीबीएसजवळ मंगळवारी (ता. २) दुपारी विधिसंघर्षितने एका अनोळखी फिरस्त्याच्या डोक्यात दगड मारून त्याचा जागीच खून केला. या घटनेनंतर शहरात एकच खळबळ उडाली असून, या प्रकरणी तिघा विधिसंघर्षितांना शहर गुन्हे शाखेच्या युनिट एकच्या पथकाने ताब्यात घेतले. सरकारवाडा पोलिसांत खुनाचा गुन्हा नोंदविण्यात आला आहे.