संवेदनशील भागांतील सीसीटीव्हींवर आता जिल्हास्तरीय देखरेख

संवेदनशील भागांतील सीसीटीव्हींवर आता जिल्हास्तरीय देखरेख
Published on: 
ॲंकर (सीसीटीव्हीचा संग्रहित फोटो वापरता येईल) --- संवेदनशील ठिकाणांच्या सीसीटीव्हींचे आता संयुक्त संनियंत्रण पोलिस, महापालिका आणि महसूल प्रशासनाचा सहभाग; सहा सदस्यीय समिती गठीत सकाळ वृत्तसेवा जळगाव, ता. १३ : शहरातील संवेदनशील आणि अतिसंवेदनशील भागांतील सीसीटीव्ही यंत्रणेच्या कामकाजावर आता केवळ पोलिस प्रशासनाचेच नव्हे, तर जिल्ह्यातील विविध प्रशासकीय यंत्रणांचेही लक्ष राहणार आहे. सीसीटीव्ही कॅमेऱ्यांचे प्रभावी संनियंत्रण, देखभाल आणि कार्यवाहीबाबत निर्णय घेण्यासाठी पोलिस अधीक्षक श्रीकांत धिवरे यांनी सहा सदस्यीय जिल्हास्तरीय समिती गठीत केली आहे. त्यामुळे शहरातील महत्त्वाच्या ठिकाणांवरील सीसीटीव्ही यंत्रणेच्या कामकाजाला प्रशासकीय स्तरावर अधिक व्यापक देखरेख मिळणार आहे. गृह विभागाच्या शासन निर्णयानुसार २ नोव्हेंबर २०२६ रोजी यासंदर्भातील आदेश काढण्यात आले आहेत. कायदा व सुव्यवस्था राखणे, गुन्हेगारी घटनांवर नियंत्रण ठेवणे आणि संवेदनशील ठिकाणांवर घडणाऱ्या हालचालींवर लक्ष ठेवण्यासाठी सीसीटीव्ही यंत्रणा महत्त्वाची ठरते. मात्र, या यंत्रणेचे प्रभावी संनियंत्रण आणि कार्यवाही सुनिश्चित करण्यासाठी स्वतंत्र समितीची व्यवस्था करण्यात आली आहे. समितीमध्ये हे असणार सदस्य या समितीच्या अध्यक्षपदी पोलिस अधीक्षक श्रीकांत धिवरे असतील. जिल्हाधिकाऱ्यांचे प्रतिनिधी, महापालिका आयुक्त, निवासी उपजिल्हाधिकारी आणि शहर वाहतूक शाखेचे पोलिस निरीक्षक सदस्य असतील. तर पोलिस उपअधीक्षक (गृह) किंवा पोलिस अधीक्षकांनी नामनिर्देशित केलेला अधिकारी सदस्य सचिव म्हणून काम पाहणार आहे. चौकट तिन्ही विभाग एकाच व्यासपीठावर सीसीटीव्ही यंत्रणेच्या संनियंत्रणाबाबत धोरणात्मक निर्णय घेणे आणि संबंधित विभागांमध्ये समन्वय राखणे, ही या समितीची प्रमुख जबाबदारी असेल. त्यामुळे पोलिस, महसूल आणि महापालिका प्रशासन एकाच व्यासपीठावर येऊन शहराच्या सुरक्षेसंदर्भातील यंत्रणेवर लक्ष ठेवणार आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.