MSI26B09633
म्हसदी : सी. डी. देवरे माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालयाचा विभाग स्तरावर निवड झालेला खो -खो संघ.
-------------------------
देवरे विद्यालयातील खो- खो
संघाची विभागस्तरावर निवड
म्हसदी, ता. ३ : धुळे जिल्हा क्रीडा संकुलात जिल्हा पातळीवरील पावसाळी खो- खो स्पर्धेत येथील सी. डी. देवरे माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालयातील खो- खो संघाने सहभाग नोंदवला होता. धुळे जिल्ह्यातून चार संघ या स्पर्धेत सहभागी झाले होते. खो- खो स्पर्धेत सी. डी. देवरे माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालयातील १९ वर्षाच्या आतील संघाने अंतिम सामना अटीतटीने जिंकला असून, या संघाची विभाग स्तरावर खो-खो खेळण्यासाठी निवड झाली आहे.
संघात दिग्विजय देवरे, चेतन सासके, चेतन काकूळते, गौरव देवरे, पराग देवरे, सुनील मालचे, कुणाल पवार, निखिल नेरे, वेदांत देसले, रितेश नेरे, मित नेरे, विशाल गायकवाड आदी खेळाडूंचा सहभाग होता. सर्व खेळाडूंनी प्रतिस्पर्धी संघातील खेळाडूंवर मात करत विजेतेपद पटकावले. खेळाडूंना क्रीडा शिक्षक के. पी. देवरे, माजी विद्यार्थ नितीन पवार यांनी मार्गदर्शन केले. संस्थेचे अध्यक्ष राजेंद्र देवरे यांनी विद्यार्थ्यांचे जिल्हा स्तरावरील खो- खो क्रीडा स्पर्धेत मिळालेल्या यशाबद्दल कौतुक केले. प्राचार्य एन. ए. देवरे यांनी कौतुक केले.