रोटरीतर्फे मानवतेची दिवाळी साजरी

रोटरीतर्फे मानवतेची दिवाळी साजरी
Published on: 
फोटो : NSK26H34720 नंदुरबार : दिवाळी किटचे वाटप करताना नंदकिशोर सूर्यवंशी, सचिव महेश रघुवंशी, प्रशांत कोटेचा, राजेश्वर चौधरी आदी. ----------- रोटरीतर्फे मानवतेची दिवाळी उत्साहात नंदुरबार, ता. ७ : रोटरी क्लब ऑफ नंदनगरीतर्फे मानवतेची दिवाळी हा नाविन्यपूर्ण उपक्रम दिवाळीच्या पूर्वसंध्येला साजरा करण्यात आला. गेल्या आठ वर्षांपासून गरजवंत, गरीब कुटुंबीय, शेतकरी आणि बालकांना रोटरीचे सदस्य आणि मित्रपरिवार एकत्र येऊन दैनंदिन जीवनातील आवश्यक किराणा वस्तू तसेच साधने, खेळणी आणि फटाके आदी साहित्य वाटप करतात. यंदाही ५० गरजू कुटुंबीयांना ‘मानवतेची दिवाळी’अंतर्गत विविध आवश्यक संसारोपयोगी वस्तूंचे व खाद्यपदार्थांचे वाटप करण्यात आले. उपक्रमासाठी रोटरी क्लब ऑफ नंदनगरीच्या अनेक सदस्यांनी योगदान दिले. नंदुरबार शहरातील आसपासच्या गावातील गरजवंत कुटुंबे शोधून त्यांना दिवाळीचे किट वाटप करण्यात आले. उपक्रम राबविण्यासाठी प्रोजेक्ट क्लब ऑफ नंदनगरीचे अध्यक्ष नंदकिशोर सूर्यवंशी, सचिव महेश रघुवंशी, प्रोजेक्टचे चेअरमन प्रशांत कोटेचा, राजेश्वर चौधरी, सय्यद इस्रार, युनूस पठाण, फक्रुद्दीन भाई, राहुल पाटील, विजय मंगलानी, सनी जैन, अंकित भन्साली, अंकित ओस्तवाल, नागसेन पेंढारकर, हेमंत चौरे, गणेश पवार यांनी योगदान दिले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.