Tulsi Vivah in ISKCON : इस्‍कॉन मंदिरात तुळशी शाळिग्राम विवाहाचा जल्‍लोष

Tulsi VIvah Reference image
Tulsi VIvah Reference imageesakal

नाशिक : आंतरराष्ट्रीय कृष्ण भावनामृत संघ (इस्कॉन), नाशिक यांच्‍यातर्फे तुळशी शाळिग्राम विवाह जल्लोषात साजरा करण्यात आला. येत्‍या मंगळवारी (ता.८) चंद्रग्रहण असल्‍याने हा सोहळा रविवारी (ता.६) पार पडला. यानिमित्त आयोजित विविध कार्यक्रमांमध्ये भाविकांनी सहभाग नोंदविला. महाप्रसादाचेही आयोजन यावेळी केले होते. (Celebration of Tulsi Shaligram Marriage in ISKCON Temple tulsi vivah 2022 nashik news)

Tulsi VIvah Reference image
Old Age Home : ज्येष्ठांना आरोग्यापासून मन रिझवण्याचा आधार

महोत्सवानिमित्त मंदिर तसेच श्री राधा कृष्णांच्या विग्रहाची सुंदर सजावट केली होती. विवाहासाठी सजविलेल्‍या वेदीवर तुळशी व शाळिग्राम ठेवण्यात आले होते. वेदीवर वृंदावनातील नयनरम्य देखावा सादर करण्यात आला. शास्त्रोक्त पद्धतीने गोरज मुहूर्तावर विवाह सोहळा पार पाडला. तत्‍पूर्वी सायंकाळी चारपासून धार्मिक कार्यक्रमांना सुरवात झाली. सुरवातीला कीर्तन झाल्‍यानंतर, नयनरम्य दर्शनाचा तसेच महाप्रसादाचा लाभ उपस्‍थित भाविकांनी घेतला.

महोत्सवाच्या यशस्वितेसाठी मंदिराचे अध्यक्ष कृष्णधन दास, गोपालानंद प्रभू, नादिया कुमार प्रभू, नृसिम्ह कृपा प्रभू, मुकुंद रस प्रभू, सरस कृष्ण प्रभू, सार्वभौमकृष्ण प्रभू, भगवान नरसिंह प्रभू, लिलाप्रेम प्रभू, अच्युत प्राण प्रभू, सुमेध पवार, अक्षय एडके, सत्यभामा कुमारी माताजी, प्रेम शिरोमणी माताजी आदींनी परीश्रम घेतले.

Tulsi VIvah Reference image
Nashik : मुंबईच्या वकिलाची हरवलेली बॅग पोलिसांच्या तप्तरतेने परत

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com