जनगणनेसाठी कर्मचाऱ्यांना प्रशिक्षण

जनगणनेसाठी कर्मचाऱ्यांना प्रशिक्षण
Published on: 
फोटो : 35231 नंदुरबार : शिबिराप्रसंगी उपस्थित अजय ठाकूर, डॉ. मित्ताली सेठी, आशा संघवी, श्रीकांत बनकर, नायब तहसीलदार रमेश वळवी. ---------- जनगणनेसाठी कर्मचाऱ्यांना दोनदिवसीय जिल्हास्तरीय प्रशिक्षण नंदुरबार, ता. १८ : जनगणना २०२७ च्या दुसऱ्या टप्प्यातील गणनेच्या अनुषंगाने जिल्हाधिकारी कार्यालयातील वीर बिरसा मुंडा सभागृहात दोनदिवसीय जिल्हास्तरीय प्रशिक्षण शिबिर झाले. प्रशिक्षणात जिल्ह्यातील सर्व तहसीलदार, चार्ज अधिकारी, मुख्याधिकारी तसेच जनगणनेशी संबंधित अधिकारी व कर्मचारी सहभागी झाले होते. जनगणना कार्य संचालनालयाचे सहायक संचालक अजय ठाकूर यांनी जनगणनेच्या दुसऱ्या टप्प्याची माहिती दिली. त्यानुसार १० ते २४ जानेवारी या कालावधीत स्वयंगणना प्रक्रिया होणार आहे. २५ जानेवारी ते २८ फेब्रुवारी या कालावधीत प्रत्यक्ष लोकसंख्या शिरगणनेचे काम होणार आहे. या टप्प्यात प्रगणक व पर्यवेक्षक यांची नियुक्ती, त्यांचे प्रशिक्षण, तसेच सीएमएमएस पोर्टलद्वारे करावयाच्या ऑनलाइन कामकाजाबाबत मार्गदर्शन करण्यात आले. चार्ज अधिकारी व संबंधित कर्मचाऱ्यांना पोर्टल हाताळणीचे प्रात्यक्षिक प्रशिक्षणही देण्यात आले. जनगणनेचे काम अचूक, काळजीपूर्वक आणि विहित वेळेत पूर्ण करण्यासाठी सर्व चार्ज अधिकाऱ्यांनी पोर्टलवरील कामकाज दक्षतेने करावे, असे आवाहनही या वेळी करण्यात आले. शिबिरास जिल्हाधिकारी डॉ. मित्ताली सेठी, निवासी उपजिल्हाधिकारी आशा संघवी, श्रीकांत बनकर, नायब तहसीलदार रमेश वळवी आदी उपस्थित होते.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.