करिश्मा नायर यांचा क्षेत्रीय दौरा

करिश्मा नायर यांचा क्षेत्रीय दौरा
Published on: 
NSK26H33703 जळगाव : पाहणी दौऱ्यात अंगणवाडीतील सुविधांबाबत माहिती घेताना सीईओ करिश्‍मा नायर. –––– प्रत्यक्ष पाहणीनंतर दर्जेदार सुविधा देण्याबाबत ताकीद (उपशीर्षक) सीईओ नायर यांचा दोन तालुक्‍यात दौरा सकाळ वृत्तसेवा जळगाव, ता. २७ : एरंडोल व धरणगाव तालुक्यांतील विविध गावांमध्‍ये जाऊन तेथील घरकुल बांधकाम, जिल्हा परिषद शाळा, अंगणवाडी, ग्रामपंचायत कार्यालय तसेच प्राथमिक आरोग्य केंद्रातील कामकाजाची पाहणी केली. तसेच ग्रामीण भागातील नागरिकांना शासनाच्या विविध योजनांचा लाभ प्रभावीपणे मिळतो आहे का? त्यांना पुरविण्यात येणाऱ्या मूलभूत सुविधा दर्जेदार आहेत का? याची प्रत्यक्ष पडताळणी करून दर्जेदार सुविधा देण्याबाबत मुख्‍य कार्यकारी अधिकारी करिश्‍मा नायर यांनी कर्मचाऱ्यांना ताकीद दिली. जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी करिश्मा नायर यांनी मंगळवारी एरंडोल व धरणगाव तालुक्यांतील विविध गावांना प्रत्यक्ष भेटी दिल्‍या. यात सकाळ सत्रात एरंडोल तालुक्यातील हनुमंतखेडे येथे भेट देऊन सुरू असलेल्या घरकुल बांधकामांची पाहणी केली. घरकुल योजनेच्या लाभार्थ्यांना वेळेत घरे पूर्ण करता यावी, यासाठी बांधकामाच्या प्रगतीचा आढावा घेतला. तसेच गावातील जि. प. प्राथमिक शाळा व अंगणवाडीला भेट देऊन तेथील शैक्षणिक वातावरण, उपलब्ध सोयी-सुविधा आणि विद्यार्थ्यांना पुरविण्यात येणाऱ्या सुविधांची माहिती घेतली. तसेच गालापूर ग्रामपंचायत कामकाजाचा आढावा घेतला व सोनवद प्राथमिक आरोग्य केंद्रात तपासणीही केली.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com