तरसोद येथे भेट; आरोग्य सुविधा व शैक्षणिक गुणवत्तेचा घेतला आढावा

तरसोद येथे भेट; आरोग्य सुविधा व शैक्षणिक गुणवत्तेचा घेतला आढावा
Published on: 
NSK26H32461 जळगाव : तरसोद येथील भेटीदरम्‍यान गावातील अंगणवाडीत पाहणी करताना सीईओ करिश्‍मा नायर. ––– तरसोदला सीईओंकडून आरोग्य सुविधांचा आढावा सकाळ वृत्तसेवा जळगाव, ता. १५ : जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी करिश्मा नायर यांनी जळगाव तालुक्यातील तरसोद येथे भेट देऊन ग्रामपंचायत कार्यालय, आरोग्य उपकेंद्र, प्राथमिक शाळा तसेच अंगणवाडीची पाहणी केली. या भेटीदरम्यान त्यांनी विविध शासकीय सुविधांचा आढावा घेत संबंधित अधिकारी व कर्मचाऱ्यांना आवश्यक सूचना दिल्या. मुख्‍य कार्यकारी अधिकारी नायर यांनी ग्रामपंचायत कार्यालयाच्या भेटीदरम्यान ग्रामपंचायतीच्या कामकाजाची व पुरविण्यात येणाऱ्या सुविधांची माहिती घेतली. गावाच्या विकासासाठी विविध शासकीय योजनांची प्रभावी अंमलबजावणी करून नागरिकांना दर्जेदार सेवा उपलब्ध करून देण्याच्या दृष्टीने कार्यवाही करण्याचे निर्देश दिले. तर आरोग्य उपकेंद्राच्या पाहणीवेळी नागरिकांना वेळेत आरोग्य सुविधा उपलब्ध करून देण्याच्‍या सुचना केल्‍या. त्यानंतर जिल्हा परिषद प्राथमिक शाळेला भेट देऊन त्यांनी शैक्षणिक कामकाजाचा आढावा घेतला. विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक गुणवत्तेत सुधारणा घडवून आणण्यासाठी शिक्षकांनी विशेष प्रयत्न आवश्यक असल्याचे नमूद केले. विद्यार्थ्यांची अध्ययन निष्पत्ती नियमितपणे तपासून ज्या विद्यार्थ्यांना अधिक मार्गदर्शनाची आवश्यकता आहे, त्यांच्याकडे विशेष लक्ष द्यावे, असे आवाहन त्यांनी केले. अंगणवाडीच्या पाहणीदरम्यान बालकांना मिळणाऱ्या सुविधा, पोषण आहार आणि पूर्वप्राथमिक शिक्षणाच्या कामकाजाची माहिती घेऊन बालकांच्या सर्वांगीण विकासासाठी आवश्यक काळजी घेण्याच्या सूचनाही त्यांनी दिल्या. –––––––––––

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com