CET Exam 2026-27
sakal
नाशिक: वेगवेगळ्या व्यावसायिक अभ्यासक्रमांमध्ये प्रवेशासाठी तेरा सीईटी परीक्षांच्या नोंदणीची प्रक्रिया सध्या सुरू आहे. या परीक्षांसाठी राज्यातील दीड लाखाहून अधिक विद्यार्थ्यांनी नोंदणी केली. सोमवार (ता. १९)पर्यंत एक लाख ५१ हजार ८५७ विद्यार्थ्यांनी ‘सीईटी’साठी नोंदणी शुल्क भरले होते; तर सुमारे साठ हजार विद्यार्थी नोंदणी प्रक्रियेत सहभागी झाले होते.