नाशिक- गेल्या महिनाभरामध्ये जबरी चोरी करणाऱ्यांनी शहरात अक्षरश: धुडगूस घातल्याचे चित्र आहे. आयुक्तालय हद्दीमध्ये तब्बल २८ जबरी चोरीचे गुन्हे पोलिस ठाण्यांमध्ये दाखल असून, सोनसाखळी व मोबाईल चोरट्यांनी पोलिसांसमोर आव्हान उभे केले आहे. .शहर पोलिस आयुक्तालय हद्दीमध्ये महिलांना लक्ष्य करीत त्यांच्या गळ्यातील सौभाग्याचं लेणं अर्थात मंगळसूत्र, सोन्याच्या चेन खेचून नेण्याचे घटना वारंवार घडत आहेत. गेल्या एप्रिल महिन्यात शहर आयुक्तालय हद्दीमध्ये जबरी चोरीचे २८ गुन्हे दाखल आहेत. सर्वाधिक चेन स्नॅचिंगच्या घटना म्हसरूळ पोलिस ठाण्याच्या हद्दीत घडल्या आहेत. .दुचाकीवरून येणारे भामटे सोनसाखळी घातलेल्या महिलांना हेरून त्यांच्या गळ्यातील सोन्याचा ऐवज बळजबरीने हिसकावून नेत आहेत. याशिवाय, रस्त्याने मोबाईलवर बोलत जाणाऱ्यांचे मोबाईलही हिसकावून नेण्याच्या घटना वाढल्या आहेत..गेल्या महिन्यात चेन स्नॅचिंगच्या १४, तर मोबाईल व रोकड हिसकावून नेण्याच्या प्रत्येकी सात घटना घडल्या आहेत. सोनसाखळी चोरट्यांनी गत महिन्यातील १४ चेन स्नॅचिंग करीत तब्बल दहा लाख २५ हजार ५०० रुपयांचा ऐवज हिसकावून नेला आहे. तर, ४० हजारांचे सात मोबाईल बळजबरीने नेले आहेत. याशिवाय, लूटमार करताना एका दुचाकीसह ८२ हजार २०० रुपयांची रोकडही चोरट्यांनी हिसकावून नेली आहे..पोलिसांसमोर आव्हानशहर गुन्हे शाखेने दोन-तीन महिन्यांपूर्वी म्हसरूळ हद्दीतून चेन स्नॅचिंग करणारी टोळी जेरबंद केली होती. या टोळीकडून शहरातील तब्बल १७ जबरी चोरीच्या गुन्ह्यांची उकल झाली होती. त्यानंतर शहरात चेन स्नॅचिंगला आळा बसला. परंतु, गेल्या महिन्यात सोनसाखळी चोरट्यांनी पुन्हा डोके वर काढले आहे. त्यामुळे वाढत्या जबरी चोरीच्या घटनांना आळा घालण्याचे मोठे आव्हान पोलिसांसमोर उभे राहिले आहे..सराईत सोनसाखळी चोरट्याला अटकगेल्या आठवड्यात गंगापूर पोलिसांनी सराईत सोनसाखळी चोरट्याला अटक केली आहे. अनिकेत ऊर्फ अंड्या शार्दूल हा विधीसंघर्षित बालकांच्या मदतीने महिलांना लक्ष्य करीत त्यांच्या गळ्यातील सोन्याची पोत खेचून नेत होता. गंगापूरसह म्हसरूळ, उपनगर, मुंबई नाका, सातपूर, नाशिक रोड हद्दीतील जबरी चोरीच्या गुन्ह्यांची उकल झाली आहे..सावधगिरी बाळगाघराबाहेर पडताना शक्यतो मौल्यवान वस्तू वापरू नयेगळ्याभोवती स्कार्प बांधावारस्त्याने चालताना समोरून वा पाठीमागून येणाऱ्या वाहनांवर बारकाईने लक्ष असावेरस्त्याने चालताना मोबाईलवर बोलू नये.Crime News : महिलेचा पाठलाग करणारा पोलिसांच्या ताब्यात.सोनसाखळी चोरीच्या घटना घडल्यानंतर पोलिसांकडून तत्काळ परिसरात नाकाबंदी करीत शोध घेतला जातो. परिसरातील सीसीटीव्ही फुटेजवरून संशयितांचा माग काढण्यात येतो. महिलांनीही सावधगिरी बाळगणे गरजेचे आहे. - प्रशांत बच्छाव, पोलिस उपायुक्त, शहर गुन्हे शाखा.सकाळ+ चे सदस्य व्हा ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.