नाशिक- सिडको, अंबड परिसरात महिलांना हेरून साथीदारांच्या मदतीने त्यांच्या गळ्यातील सोन्याचे मंगळसूत्र खेचून नेणाऱ्याच्या अंबड पोलिसांनी मुसक्या आवळल्या आहेत. संशयित सोनसाखळी चोर कंपनी कामगार असून, झटपट पैशांसाठी तो चैनस्नॅचिंग करीत असल्याचे समोर आले आहे. दोन चैनस्नॅचिंगच्या गुन्ह्यांची उकल झाली असून, गुन्ह्यात वापरलेल्या दुचाकीसह सुमारे दोन लाखांचा मुद्देमाल जप्त केला आहे.