दिगंबर पाटोळे : वणी- भगवतीच्या भेटीच्या ओढीने रणरणत्या उन्हात शेकडो मैलांचा प्रवास करीत उत्तर महाराष्ट्रातील भाविक बुधवारी (ता.९) सप्तशृंगगडावर पोहोचून मातेच्या चरणी लीन झाले. चैत्रोत्सवाच्या आजच्या चौथ्या माळेस सप्तशृंगीदेवीच्या मंदिरात पंचामृत महापूजा उत्साहपूर्ण वातावरणात करण्यात आली.