Navratri 2023: ‘आग्या हो विसरग्या हो’चा गावागावांत गजर! शारदीय नवरात्रोत्सवातील अष्टमीनिमित्त चक्रपूजा

On the occasion of Ashtami in the Sharadiya Navratri festival, the palanquin man Rajendra Ramchandra Deshmukh has a Chakra Puja tied with the palanquin mask of Shri Jagdamba Devi.
On the occasion of Ashtami in the Sharadiya Navratri festival, the palanquin man Rajendra Ramchandra Deshmukh has a Chakra Puja tied with the palanquin mask of Shri Jagdamba Devi.esakal

Navratri 2023 : आदिशक्तीचा नवरात्रोत्सवाचा जागर व दांडियाची धूम सर्वत्र असताना, गावागावांत ग्रामदेवताचाही जागर सुरू आहे.

यात चक्रपूजा विधीला ललिता पंचमीपासून सरवात झाली झाली आहे. गावागावांत ‘आग्या हो विसरग्या हो’चा गजर निनादू लागला आहे. (Chakra Puja on Ashtami of Sharadiya Navratri festival at wani nashik)

नवरात्रोत्सव आदिशक्तीचा उत्सव मानला जातो. शक्तीच्या देवतेला प्रसन्न करण्यासाठी खानदेशासह जिल्ह्यात मोठ्या प्रमाणात चक्रपूजा केली जाते.

नवरात्रोत्सवाला मोठे महत्त्व आहे. नऊ दिवस चालणाऱ्या उत्सवात पाचव्या, सातव्या, आठव्या व नवव्या माळेला चक्रपूजा केली जाते. बहुतेक कुटुंबीय घरात घटस्थापनेजवळच चक्रपूजा करतात, तर काही जण नवसपूर्ती म्हणून गडावर चक्रपूजा करतात.

हा विधी बुवा आणि बुराडी या यंत्रांवर केला जातो. कुटुंबातील पंरपरेनुसार वर्षा आड, तिसऱ्या वर्षी याप्रमाणे चक्रपूजा केली जाते. चक्रपूजेसाठी पाच अथवा अकरा ओंजळ तांदूळ, अकरा कणकेचे दिवे, नारळ या साहित्याबरोबरच अकरा पुरणपोळ्या (मांडे), पुऱ्या, करंजा आदी साहित्य लागते.

On the occasion of Ashtami in the Sharadiya Navratri festival, the palanquin man Rajendra Ramchandra Deshmukh has a Chakra Puja tied with the palanquin mask of Shri Jagdamba Devi.
Navratri 2023 : नववी माळ, सिद्धी प्राप्त करवून देणारी देवी सिद्धादात्री; अशी करावी मातेची पूजा

चक्रपूजा रचण्यासाठी पेरू, सीताफळ, आंबे, चाफा, रामफळ, कापूर, उडीद, गुलाल आदी साहित्य लागते. एक चक्र पांढरे, तर दुसरे चक्र रंगीत तांदळाचे अशी सात चक्र काढली जातात. चक्राच्या चारही बाजूला दरवाजे केले जातात.

दरवाजांजवळ मीठ, उडीद, तांदूळ, राख यांचे चार मारुती तयार केले जातात. अकरा कणकेचे दिवे चक्रावर ठेवले जातात. मेंढ्या हा प्रमुख दिवा असतो. चक्रपूजेच्या मुख्य जागी अकरा मांडे गोलाकार ठेवून त्यावर दिवे ठेवण्यात येतात.

घरात तेवत असलेल्या अखंड वातेवरून मेढ्या पेटवला जातो. हा मेंढ्या पेटताच ‘बोल अंबे की जय’, असा जयघोष केला जातो.

या वेळी होमही केला जातो. या विधीसाठी सर्व कुटुंब सदस्य व नातेवाईक, सगेसोयरे, मित्र परिवारास निमंत्रित करून प्रसाद म्हणून चक्रावर ठेवलेले पदार्थ ग्रहण केले जातात.

On the occasion of Ashtami in the Sharadiya Navratri festival, the palanquin man Rajendra Ramchandra Deshmukh has a Chakra Puja tied with the palanquin mask of Shri Jagdamba Devi.
Navratri 2023 : आई अंबाबाईच्या मंदिरातील खांब मोजताच येत नाहीत, हे खरंय का?

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com