शिदवाडी शिवारातील शेतजमीन बनावट कागदपत्राव्दारे विक्रीचा कट फसला

शिदवाडी शिवारातील शेतजमीन बनावट कागदपत्राव्दारे विक्रीचा कट फसला
Published on: 
बनावट कागदपत्र तयार करुन जमीन विकण्याचा कट उघड चाळीसगाव पोलिसांत दोघांविरुद्ध गुन्हा दाखल सकाळ वृत्तसेवा चाळीसगाव, ता. १३ : शिदवाडी (ता. चाळीसगाव) शिवारातील दोन हेक्टर ८० आर शेतजमीन मूळ मालकाच्या संमतीशिवाय बनावट कागदपत्रांच्या आधारे परस्पर विक्री करण्याचा प्रयत्न केल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. याप्रकरणी नकुल राजू खरात आणि प्रशांत रमेश निकम या दोघांविरुद्ध येथील पोलिसांत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. मालकाच्या सतर्कतेमुळे हा प्रकार वेळीच उघडकीस आला. याबाबत शुभम दिलीपराव देशमुख (वय २९, रा. छत्रपती संभाजीनगर) यांनी पोलिसांत फिर्याद दिली, की शिदवाडी शिवारातील भूमापन क्रमांक २२६/३ मध्ये त्यांची दोन हेक्टर ८० आर शेतजमीन आहे. ७ ऑक्टोबरला त्यांना ही जमीन परस्पर विक्री करण्यासाठी बनावट कागदपत्रे तयार करण्यात आल्याची माहिती मिळाली. त्यांनी सोमनाथ केदार यांच्याकडून माहिती घेतली. ५ ऑक्टोबरला येथील आदित्य हॉटेलजवळील मुद्रांक विक्रीच्या ठिकाणी प्रशांत निकम याच्यासोबत एक व्यक्ती आलेली होती. त्याने आपले नाव शुभम दिलीपराव देशमुख असल्याचे सांगून अलवाडी येथील पत्त्यावरील नावाने तयार केलेल्या पॅनकार्ड व मतदान ओळखपत्राच्या प्रती मोबाईलमध्ये दिल्या होत्या. या कागदपत्रांच्या प्रतींची तपासणी केली असता, त्या बनावट असल्याचे फिर्यादीच्या निदर्शनास आले. अधिक चौकशी केल्यानंतर शुभम देशमुख यांचे नाव धारण करणाऱ्या व्यक्तीचे खरे नाव नकुल राजू खरात (रा. पंचशीलनगर, चाळीसगाव) असल्याची माहिती मिळाली. त्याचा मित्र प्रशांत रमेश निकम (रा. हिरापूर रोड, सुयश लॉन्समागे, चाळीसगाव) याच्यासोबत मिळून शेतजमीन परस्पर विक्री करण्याचा कट रचल्याचा आरोप फिर्यादीत करण्यात आला आहे. या प्रकरणी नकुल खरात आणि प्रशांत निकम यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास पोलिस करीत आहेत. ------------------------

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com