सातपूर-सिन्नर येथील इंडिया बुल्सची सुमारे 550 हेक्टर पडून असलेली जमीन आणि सिन्नर, आडवण, पारदेवी, आक्राळे, जांबूटके, राजूर बहुला आदी क्षेत्रातील हजारो हेक्टर जमीन महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळ (MIDC) च्या विकासासाठी भूसंपादन प्रक्रियेत आहे. ही प्रक्रिया अनेक वर्षांपासून सुरू असली तरी अद्याप पूर्णत्वास गेलेली नाही.