जुने नाशिक- पाण्याच्या पाइपलाइनवर स्मार्ट मीटर बसविण्यासाठी खोदलेले खड्डे अखेर चेंबर बांधून बंद करण्याच्या कामास सुरुवात झाली. बडी दर्गा उर्दू शाळेत लागून असलेल्या मैदानावर गेल्या महिनाभरापासून खड्डे खोदून ठेवले होते. स्मार्ट मीटर बसूनही खड्डे बुजविण्यात आले नव्हते. याबाबतचे वृत्त ‘सकाळ’मध्ये प्रसिद्ध होताच कामास वेग आला आहे.