महिलेवर झालेल्या अत्याचारप्रकरणी चौकशीची मागणी

महिलेवर झालेल्या अत्याचारप्रकरणी चौकशीची मागणी
Published on: 
फोटो : NSK26H31663 नंदुरबार : जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन देताना चर्मकार महासंघाचे संतोष वसईकर, संतोष अहिरे, हंसराज अहिरे, विजय अहिरे, भास्कर पवार आदी. --- अत्याचारप्रकरणी निष्पक्ष चौकशीची मागणी दोषींवर कठोर कारवाईसह पीडितेला न्याय द्या, चर्मकार महासंघाची मागणी सकाळ वृत्तसेवा नंदुरबार, ता. ११ : धुळे शहरातील महिलेवरील कथित अत्याचारप्रकरणी निष्पक्ष चौकशी करून दोषींवर कठोर कारवाई करावी आणि पीडितेला तातडीने न्याय मिळवून द्यावा, अशी मागणी राष्ट्रीय चर्मकार महासंघाच्या पदाधिकाऱ्यांनी केली आहे. यासंदर्भात नंदुरबार जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन देण्यात आले. निवेदनात म्हटले आहे, की या घटनेमुळे चर्मकार समाजात संतापाचे वातावरण आहे. प्रकरणाची सखोल चौकशी करून वस्तुस्थिती समोर आणावी. या प्रकरणात सहभाग आढळणाऱ्यांवर कायद्यानुसार कारवाई करावी. पीडित महिलेला कायदेशीर संरक्षण, वैद्यकीय मदत, समुपदेशन आणि आवश्यक सहाय्य उपलब्ध करून द्यावे. तसेच प्रकरणाचा जलदगतीने न्यायालयीन निपटारा होण्यासाठी पाठपुरावा करावा, अशी मागणी करण्यात आली आहे. या वेळी राष्ट्रीय चर्मकार महासंघाचे जिल्हाध्यक्ष संतोष वसईकर यांच्यासह संतोष अहिरे, हंसराज अहिरे, विजय अहिरे, भास्कर पवार, बलदेव वसईकर, संजय अहिरे, हरीश अहिरे, मोहन अहिरे, धनराज अहिरे, हेमंत अहिरे, राजू अहिरे, किरण अहिरे, चंद्रकांत अहिरे, पिंटू अहिरे, काशीनाथ अहिरे, संतोष शंकर अहिरे आणि दीपक अहिरे यांनी निवेदन दिले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com