चणकापूर कालव्याच्या पाण्यासाठी देवळा तालुक्याच्या पूर्व भागातील शेतकरी यांचे आंदोलन

चणकापूर कालव्याच्या पाण्यासाठी देवळा तालुक्याच्या पूर्व भागातील शेतकरी  यांचे आंदोलन
Published on: 
पान चार सेकंड मेन -------------------- 08727 देवळा : तालुक्याच्या पूर्व भागाला चणकापूर उजव्या कालव्याचे पाणी मिळावे या व इतर मागण्यांसाठी आंदोलन करताना शेतकरी व प्रहार संघटनेचे पदाधिकारी व कार्यकर्ते. चणकापूरच्या पाण्यासाठी देवळ्यात शेतकऱ्यांचा आंदोलन दुष्काळाच्या पार्श्वभूमीवर पाणीप्रश्न ऐरणीवर; अभियंत्याकडून आश्‍वासन सकाळ वृत्तसेवा देवळा, ता.२३ : तालुक्याच्या पूर्व भागाला चणकापूर उजव्या कालव्याचे पाणी मिळावे या व इतर प्रलंबित मागण्यांसाठी तालुक्याच्या पूर्व भागातील शेतकरी व प्रहार शेतकरी संघटनेच्या कार्यकर्ते यांनी शुक्रवारी (ता.२३) तापी खोरे अंतर्गत येणाऱ्या चणकापूर कालवा उपविभागीय कार्यालयाच्या बाहेर आंदोलन करत जोरदार घोषणाबाजी केली. दुष्काळाच्या पार्श्वभूमीवर तालुक्यातील पाणीप्रश्न ऐरणीवर आला आहे. यंदा दुष्काळामुळे देवळा तालुक्यातील पूर्व गावांमधील खरीप हंगाम वाया गेला आहे. आणि चणकापूर वाढीव कालव्याचे पाणी न मिळाल्याने पूर्व भागातील जनता तहानलेलीच राहिली. गेल्या ५० वर्षांपासून चणकापूरचे पाणी झाडी एरंडगाव पर्यंत पोहोच करण्याचे स्वप्नच राहिले आहे. यातून असंतोष उफाळून आल्याने हे आंदोलन करण्यात आले. रामेश्वर ते झाडी कालव्याचे रुंदीकरण करून वहनक्षमता वाढविण्यात यावी, चणकापूर झाडी कालव्याला रामेश्वर धरणातून बायपास करण्यात यावे, झाडीपर्यंत सर्व गावांसाठी शेती व पिण्यासाठी पाणी आरक्षित करण्यात यावे तसेच कालव्यासाठी अधिग्रहण केलेल्या शेतकऱ्यांच्या जमिनीचा मोबदला देण्यात यावा, या कालव्याचे रुंदीकरण करून अस्तरीकरण करण्यात यावे या मागण्या यावेळी करण्यात आल्या. याप्रसंगी चणकापुर कालवा विभाग देवळा उपविभागीय अभियंता श्री.पालवे यांनी आंदोलनस्थळी भेट देऊन मागण्याबदल लवकरच लेखी देऊ असे आश्वासन दिले. मागण्यांबाबत योग्य निर्णय न झाल्यास आगामी निवडणुकांवर बहिष्कार टाकला जाईल असा इशारा निवेदनातून देण्यात आला. यावेळी रत्नाकर देवरे, हरसिंग ठोके, गणेश निंबाळकर, विलास देवरे, सुनील देवरे, रतन देवरे, दिलीप पाटील, अविनाश देवरे, किशोर सोनवणे, चंदू मोरे आदींनी या आंदोलनाचे नेतृत्व केले. देवळा तालुक्याच्या पूर्व भागाच्या गावांमधील शेतकरी व नागरिक या आंदोलनात सहभागी झाले होते.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com