मालेगाव- शहरात रमजान ईदच्या पार्श्वभूमीवर महापालिकेच्या स्वच्छता विभागातर्फे ईदगाह मैदानाची स्वच्छता केली जात आहे. ईदचे मुख्य नमाजपठण येथील कॅम्प भागातील पोलिस कवायत मैदानावर होणार आहे. आमदार मौलाना मुफ्ती मोहम्मद इस्माईल नमाज पढवतील. रविवारी (ता. ३०) चंद्रदर्शन होण्याची शक्यता असून, सोमवारी (ता. ३१) ईद साजरी केली जाणार आहे. शहरात १५ ठिकाणी नमाजपठण केले जाणार आहे.