चांदोरी- निफाड तालुक्यातील म्हाळसाकोरे शिवारात रविवारी (ता. १३) मध्यरात्री सशस्त्र चोरट्यांच्या टोळीने चार वस्त्यांवर एकाच रात्री धाडसी घरफोडी करीत शेतशिवारात खळबळ उडवून दिली. रात्री साडेबारा ते तीनच्या दरम्यान घडलेल्या या घटनेत चोरट्यांनी महिलांच्या अंगावरील दागिने, रोख रक्कम आणि मोबाईल लुटले, तर महिलांना धमकावत पुरुषांना बेदम मारहाण केली.