चांदोरी- ‘आई, मी शाळेला चाललीय...’ असा निरागस निरोप देत सातवीतील सिद्धी मंगेश लुंगसे (वय १२) सायकलने घराबाहेर पडली. मात्र, काही मिनिटांतच काळाने तिच्यावर झडप घातली. भरधाव डंपरने सिद्धीच्या सायकलला धडक दिल्याने तिचा जागीच मृत्यू झाला. या घटनेने संतप्त झालेल्या ग्रामस्थांनी दोन तास ‘रास्ता रोको’ करीत प्रशासनाच्या ढिसाळ कारभाराचा निषेध केला.