Chandori village cooking tradition
sakal
चांदोरी: आधुनिक स्वयंपाक साधनांनी घराघरांत प्रवेश केला असला तरी ग्रामीण भागातील मातीच्या चुलीची परंपरा अजूनही अनेक घरांत जिवंत आहे. गॅस, इंडक्शन यांसारख्या साधनांमुळे चुलीचा वापर काही प्रमाणात कमी झाला असला तरी बदलत्या परिस्थितीत पुन्हा पारंपरिक पर्यायांची आठवण होत असल्याचे चित्र चांदोरी परिसरात पाहायला मिळाले.