नाशिक- ''गांधी विरुद्ध गांधी'' नाटक केले असले तरी ''मी नथुराम गोडसे बोलतोय'' हे नाटक यापूर्वी केलेले नाही व यापुढेही करणार नाही. नाटकांवर सेन्सॉरशिप नसावी पण काही नाटकांसाठी सेन्सॉरशिप असणे आवश्यक आहे, असे मत ज्येष्ठ अभिनेते व दिग्दर्शक चंद्रकांत कुलकर्णी यांनी मंगळवारी (ता.२२) व्यक्त केले.