Chandrakant Patil : साध्या यंत्रमागाचा नव्या वस्त्रोद्योग धोरणात समावेश होणार : चंद्रकांत पाटील

Chandrakant Patil
Chandrakant Patilesakal

Chandrakant Patil : शहरासह राज्यात असलेल्या साध्या (प्लेन) यंत्रमागधारकांना काहीसा दिलासा मिळाला आहे.

साध्या यंत्रमागाचा नवीन वस्त्रोद्योग धोरणामध्ये समावेश, वीज सवलत कायमस्वरूपी सुरु ठेवणे, तसेच यंत्रमागधारक संघटनांच्या विविध मागण्या तत्त्वतः मान्य करण्यात आल्याचे वस्त्रोद्योग मंत्री चंद्रकांत पाटील यांनी मुंबई येथे झालेल्या बैठकीत स्पष्ट केले. (Chandrakant Patil statement Simple handlooms will be included in new textile industry policy nashik)

राज्याच्या नवीन वस्त्रोद्योग धोरण या व्यवसायातील अडीअडचणी व विविध प्रश्‍नांवर चर्चा करण्यासाठी मुंबई येथे बैठक घेण्यात आली होती. या बैठकीत आमदार मौलाना मुफ्ती मोहम्मद इस्माईल, आमदार प्रकाश आवाडे, भिवंडीचे आमदार महेश चौगुले, माजी आमदार सुरेश हाळवणकर, वस्त्रोद्योग महासंघाचे अध्यक्ष अशोक स्वामी आदींसह वस्त्रोद्योग विभागाचे अधिकारी व यंत्रमाग व्यवसाय असलेल्या विविध शहरातील प्रतिनिधी उपस्थित होते.

श्री. पाटील यांना शहरातील यंत्रमाग व्यवसायातील अडीअडचणी व मागण्यांचे सविस्तर निवेदन सादर केल्याचे यंत्रमाग व्यवसाय अभ्यासक ॲड. मुजीब अन्सारी यांनी ‘सकाळ’ला सांगितले.

राज्य शासनाच्या २०२३ ते २०२८ च्या नवीन वस्त्रोद्योग धोरणात साध्या यंत्रमागासाठी कुठलीही सवलत व योजना नसल्याने यंत्रमाग धारकांमध्ये मोठी नाराजी होती. नवीन वस्त्रोद्योग धोरण जाहीर झाल्यानंतर त्यातील त्रुटी व साध्या यंत्रमाग धारकांच्या अडचणी वाढल्याने वस्त्रोद्योग क्षेत्रातून नाराजी व्यक्त होत होती.

‘सकाळ’ने २३ जूनला ‘वीज बील अनुदान बंद झाल्यास यंत्रमाग होणार नामशेष, यंत्रमाग व्यवसायावर नवे संकट’ हे सविस्तर वृत्त व व्यवसायातील अडीअडचणी मांडल्या होत्या. स्थानिक यंत्रमाग व्यावसायिकांनी मुंबई येथील बैठकीत या बाबी निदर्शनास आणून दिल्यानंतर वीज सवलत कायमस्वरूपी सुरु ठेवण्यास सकारात्मकता दर्शविण्यात आली.

हेही वाचा : Credit Card फसवणूक....काय घ्याल काळजी?

Chandrakant Patil
Nashik Monsoon Rain: इगतपुरी तालुक्यात जोरदार पाऊस! सलग दुसऱ्या दिवशी हजेरी

तसेच यंत्रमाग उद्योजकांना जाहीर केलेली अनुक्रमे १ रुपये व ७५ पैसे प्रतियुनिट अतिरिक्त वीज सवलत पूर्वलक्षी प्रभावाने अंमलबजावणी होण्यासाठी या मागणीवर सविस्तर प्रस्ताव सादर करण्याचे आदेश श्री. पाटील यांनी दिले. मल्टीपार्टी वीज जोडणी सविस्तर माहिती घेऊन निर्णय घेतला जाणार आहे.

मुंबई येथील बैठकीतील मुद्दे

- ज्या यंत्रमागधारकांना शक्य आहे त्यांनी सौर ऊर्जेचा पर्याय स्वीकारावा

- कॅप्टीव्ह पॉवर, सोलर एनर्जी, नेट मीटरींग याबाबत सक्ती नाही.

- वस्त्राद्योग धोरणात आवश्‍यक असलेल्या मागण्यांबाबत सरकार सकारात्मक

- यंत्रमाग कामगारांच्या मंडळासाठी शासन विचाराधीन

- यंत्रमाग धोरणात काही प्रमाणात दुरुस्ती

- यंत्रमागासाठी १९८८ पासून सुरु असलेली वीज सवलत कायमस्वरूपी होणार

Chandrakant Patil
Nashik Bohada Festival: चांदोरी येथे आजपासून पारंपरिक बोहाडा उत्सव! संस्कृती संवर्धनाचा स्तुत्य प्रयत्न

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com