International Satsang Ceremony : आंतरराष्ट्रीय सत्संगासााठी सेवेकरी नेपाळला रवाना : चंद्रकांतदादा मोरे

Chandrakantada More
Chandrakantada More esakal

International Satsang Ceremony : श्री स्वामी समर्थ सेवा मार्गाच्या वतीने गुरुमाऊली आण्णासाहेब मोरे यांचे उपस्थितीत ‘श्री. अतिरुद्रात्मक रुद्राक्ष लिंगार्चन व श्री. ललिता सहस्रनाम पठण’ या सेवेचा अंतर्भाव असलेल्या भव्य आंतरराष्ट्रीय सत्संग सोहळा श्री. क्षेत्र पशुपतिनाथ काठमांडू, नेपाळ) येथे शनिवारी (ता.१०) होत आहे.

या सोहळ्याची तयारी अंतिम टप्प्यात असून त्यासाठी स्वयंसेवक सेवेकरी गेल्या तीन महिन्यांपासून झटत असल्याची माहिती श्री. स्वामी समर्थ गुरुपीठाचे महाव्यवस्थापक चंद्रकांतदादा मोरे यांनी दिली.

सेवामार्गाच्या देश- विदेश अभियानाचे प्रमुख नितीनभाऊ मोरे हे स्वतः येथील तयारीवर लक्ष ठेऊन असून गुरुपीठाशी समन्वय साधून सेवेकऱ्यांना मार्गदर्शक सूचना देत आहेत. (Chandrakantada More statement Devotees leave for Nepal for International Satsang ceremony nashik news)

चंद्रकांतदादा मोरे यांनी सांगितले की, या सोहळ्यात भारतभरातून आणि नेपाळमधून हजारो सेवेकरी, भाविक उपस्थित राहणार आहेत. गुरुमाऊलींच्या हितगुजप्रसंगी मोठ्या प्रमाणात उपस्थिती असेल. परंतु आयोजन सोपे व्हावे आणि सेवामार्गाच्या शिस्तप्रिय प्रतिमेला साजेसे व्हावं म्हणून प्रत्यक्ष लिंगार्चन सोहळ्यात प्रतिनिधिक स्वरूपात पंधरा ते वीस हजार सेवेकरी सहभागी होतील.

प्रत्यक्ष कार्यक्रम स्थळी, मंडप, व्यासपीठ उभारणी, ध्वनी, प्रकाश योजना, पार्किंग, सुरक्षा व्यवस्था, महाप्रसाद तयारी, वाटप, येणाऱ्या भाविकांची निवास व्यवस्था, येणाऱ्या भाविकास सर्व गोष्टींचे मार्गदर्शन करणे, अशा सर्व लहान, मोठ्या गोष्टींबाबत चंद्रकांतदादा व नितीनभाऊ मोरे यांच्या मार्गदर्शनानुसार वेगाने तयारी सुरू आहे.

३०० फूट रुंद आणि ७०० फूट लांब असा भव्य मंडप तर २५ फूट रुंद व ८० फूट लांब असे सोहळ्यास साजेसे व्यासपीठ उभारण्यात येते आहे. येणाऱ्या बसेससाठी पुरेशी पार्किंग व्यवस्था करण्यात आली आहे.

हेही वाचा : Credit Card फसवणूक....काय घ्याल काळजी?

Chandrakantada More
Jai Jai Swami Samartha: जेव्हा स्वामींची भूमिका साकारणारा अक्षय अक्कलकोटला जातो तेव्हा..

येणाऱ्या सेवेकरी, भाविकांच्या स्वागतासाठी नेपाळमधील सेवेकरी अत्यंत उत्सुक असून अत्यंत आनंदाने नेपाळी पद्धतीने, नेपाळी लोककलेचा, संस्कृतीचा अंतर्भाव असलेला स्वागत समारंभ स्वागत समितीचे अध्यक्ष अभिराज आचार्य घडवून आणणार आहेत.

दरम्यान रेल्वे, बसेस ने प्रवास करणारे सेवेकरी नेपाळकडे रवाना होत आहेत. यानिमित्ताने काशी, अयोध्या अशा महत्त्वपूर्ण तीर्थक्षेत्राना भेट देण्याचे नियोजनही बऱ्याच सेवेकऱ्यांनी यानिमित्त केले आहे.

गुरुमाऊली यांचे उपस्थितीत दुबईनंतर भारताबाहेर हा दुसरा सोहळा आहे. हा सोहळा भव्य दिव्य होईल, असा विश्वास स्वागत व आयोजन समितीचे अध्यक्ष अभिराज आचार्य यांनी व्यक्त केला आहे.

Chandrakantada More
Swami Samarth Gurupeeth : राज्यभरातील प्रमुख समर्थ सेवेकऱ्यांना गुरूपीठातून मार्गदर्शन करणार गुरुमाऊली

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com