चांदवड- चांदवडच्या आठवडे बाजारात गर्दीचा फायदा घेत एका महिलेच्या गळ्यातील सोन्याची पोत हिसकावून चोरून नेणाऱ्या दोन महिला चोरट्यांना चांदवड पोलिसांनी अटक केली आहे. पोलिसांनी त्यांच्याकडून चोरीस गेलेली दिड तोळ्याची सोन्याची पोत हस्तगत केली आहे. अवघ्या चार दिवसांत गुन्ह्याचा छडा लावला.