Nepali baby death
sakal
गणूर: नाशिक-चांदवड महामार्गावर झालेल्या भीषण अपघातात मृत्यू झालेल्या तीन महिन्यांच्या प्रतीक टेक या चिमुकल्याला अखेर चांदवडच्या मातीने मायेने कवेत घेतले. मायदेशी नेणे शक्य नसल्याने, नेपाळच्या या लेकरावर चांदवडच्या स्मशानभूमीत शोकाकुल वातावरणात अंत्यसंस्कार करण्यात आले. माणुसकीच्या नात्याने स्थानिक नागरिकांनी आणि प्रशासनाने पुढाकार घेतल्याने या निरागस जिवाचा शेवटचा पार पडला.