भक्तीमय वातावरणात श्री रेणुका माता मंदिरात घटस्थापना; शारदीय नवरात्रोत्सवास मंगलमय प्रारंभ

भक्तीमय वातावरणात श्री रेणुका माता मंदिरात घटस्थापना; शारदीय नवरात्रोत्सवास मंगलमय प्रारंभ
Published on: 
रेणुकेच्या चांदवडच्या दरबारात भक्तांच्या उत्साह ---------------------------------------- सकाळ वृत्तसेवा चांदवड, ता. : ‘उदो बोला, उदो अंबाबाई माऊलीचा उदो...’च्या भक्तिमय जयघोषात उत्तर महाराष्ट्राचे श्रद्धास्थान असलेल्या चांदवड निवासिनी राजराजेश्वरी कुलस्वामिनी श्री रेणुका मातेच्या शारदीय नवरात्रोत्सवाला प्रारंभ झाला. आदिशक्तीच्या दर्शनासाठी भाविकांनी मोठी गर्दी केली. तहसीलदार अनिल चव्हाण व सोनम चव्हाण यांच्या हस्ते घटस्थापना झाली. त्यानंतर धार्मिक सोहळ्यांना प्रारंभ झाला. शिवसेनेचे सचिव भाऊसाहेब चौधरी यांच्या हस्ते आरती झाली. त्यानंतर मंदिर भाविकांसाठी दर्शनासाठी खुले करण्यात आले. रात्री आठला चांदवड न्यायालयाचे न्यायाधीश एच. बी. परदेशी यांच्या हस्ते आरती करण्यात आली. आभूषणांच्या पालखीचे स्वागत नवरात्रोत्सवाच्या पहिल्या दिवशी भगवतीच्या अलंकारांची रंगमहालातून मंदिरापर्यंत पालखी मिरवणूक काढण्यात आली. मातेच्या अलंकारांच्या दर्शनासाठी भाविकांनी गर्दी केली. महिलांनी घरासमोर पालखीतील आभूषणांना हळदी-कुंकू वाहिले. औक्षण करून दर्शन घेतले. नवरात्रोत्सवात दररोज सकाळी आठला रंगमहालातून मंदिरापर्यंत, तर सायंकाळी पाचला मंदिरातून रंगमहालापर्यंत देवीच्या आभूषणांची पालखी मिरवणूक काढली जाणार आहे. विविध रूपांत मातेचे दर्शन श्री रेणुका माता असंख्य कुळांची कुलस्वामिनी आहे. त्यामुळे नवरात्रोत्सवात दूरदूरचे भाविक चांदवडला येतात. सकाळी बालरूपात, दुपारी तरुण रूपात आणि सायंकाळी वृद्ध रूपात माता दर्शन देते, अशी भाविकांची श्रद्धा आहे. दरम्यान भाविकांची गर्दी लक्षात घेऊन प्रशासनाने मंदिर परिसरात क्लोज सर्किट कॅमेरे तसेच छुपे कॅमेरे बसविले आहेत. मंदिराच्या माथ्यावर पार्किंगची व्यवस्था केली आहे. नवरात्रोत्सवात दर्शनासाठी येणाऱ्या भाविकांची गर्दी लक्षात घेऊन मंदिर प्रशासनाने सुरक्षेची विशेष व्यवस्था केली आहे. मंदिर परिसरात क्लोज सर्किट कॅमेरे तसेच छुपे कॅमेरे बसविण्यात आले असून, गर्दीच्या ठिकाणीही चित्रीकरणाद्वारे लक्ष ठेवण्यात येणार आहे. दरम्यान चौधरी फौंडेशनच्या मदतीने भाविकांसाठी प्रसाद, खिचडी आणि पिण्याच्या पाण्याचे वाटप करण्यात येणार आहे. सुमारे १२ हजार चौरस फुटांचा दर्शन रांग मंडप उभारण्यात आला आहे. भाविकांची काळजी घेण्यासाठी वैद्यकीय मदत केंद्र, रुग्णवाहिका सेवा उपलब्ध करून देण्यात आली आहे. महिला व बालकांसाठी स्वतंत्र, बंदिस्त स्तनपान सुविधेसह हिरकणी कक्षाची व्यवस्था करण्यात आली आहे.भाविकांच्या वाहनांसाठी मंदिराच्या माथ्यावर पार्किंगची व्यवस्था करण्यात आली आहे. मंदिर ट्रस्टचे व्यवस्थापक मधुकर पवार, सहाय्यक व्यवस्थापक सुभाष पवार आणि चांदवडचे पोलीस निरीक्षक अभिजित सोनवणे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस कर्मचारी, होमगार्ड आणि स्वयंसेवक बंदोबस्ताची जबाबदारी सांभाळत आहेत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com