वडनेरभैरव- महावितरणच्या कृषिपंप ग्राहकांना अखंडित, शाश्वत व दिवसा वीजपुरवठा मिळावा यासाठी मुख्यमंत्री सौर कृषिवाहिनी २.० योजनेमधून चांदवड विभागांतर्गत असलेल्या शिरूर तांगडी प्रकल्पातून पाच मेगावॉट विजेची निर्मिती सुरू झाली आहे. यामधून एक हजार ८५० कृषिपंपांना दिवसा वीजपुरवठा मिळत आहे. महावितरणचे संचालक (मानव संसाधन) राजेंद्र पवार यांनी शनिवारी या प्रकल्पाला भेट देऊन पाहणी केली.