चांदवड- अवर्षणप्रवण, दुष्काळी अन् टँकरग्रस्त असलेल्या चांदवड तालुक्यात प्रत्येक उन्हाळा टँकरशिवाय जाऊच शकत नाही. विशेषतः तालुक्यातील पूर्व भागातील गावांना तर कितीही पाऊस झाला, तरीही एप्रिल-मेमध्ये ट्रॅंकरच्या पाण्यावरच तहान भागवावी लागते. .यंदाही आतापर्यंत डोणगाव, दरेगाव, नांदुरटेक तीन गावे अन् एका वाडीने ट्रॅंकरची मागणी केली आहे. अजून अनेक गावांना ट्रॅंकरची गरज लागणार आहे. आताच पूर्व भागातील दरेगाव, डोणगाव, निमोण, शिंगवे, वाद, वराडी, कानडगाव, दहेगाव आदी गावातील विहिरींनी तळ गाठला आहे..यंदा शेवटच्या टप्प्यात चांगला पाऊस झाला असला तरी अर्ध्या तालुक्याला पाणीटंचाईच्या झळा बसत आहेत. गेल्या वर्षी वर्षभर अर्ध्याहून अधिक तालुक्याला टॅंकरने पाणीपुरवठा सुरू होता. त्या तुलनेत यावर्षीचे चित्र समाधानकारक आहे. .तरीही ग्रामीण भागात पाणीटंचाई जाणवत आहे. विहिरींनी तळ गाठला असून, जनावरांसह माणसांना पिण्याच्या पाण्यासाठी भटकंती करावी लागत आहे. तालुक्यातील जवळपास सर्वच पाझरतलाव आटले आहेत. काही गावांत ‘जलजीवन’ची कामे झाली आहेत तरीही याही गावांना पाणीटंचाईची झळ बसणार आहे. पन्नासहून अधिक गावांना ४४ गाव पाणीपुरवठा योजनेचे पाणी येते. मात्र तेही पंधरा दिवसांनी येत असल्याने या योजनेतील गावांनाही पाणीटंचाईची झळ सोसावी लागते..दोन-अडीच महिने पाणीटंचाईची तीव्रता कमी करण्यासाठी प्रशासनाला तातडीने ठोस उपाययोजना करावी लागेल. चार-पाच गावांचे ट्रॅंकरचे प्रस्ताव आले आहेत. ते वरिष्ठ कार्यालयाकडे पाठविण्यात आले असून, लवकरच या गावांना ट्रॅंकरने पाणीपुरवठा करण्यात येईल. तालुक्यातील पाणीटंचाई निवारणासाठी प्रशासन तयार आहे.- मच्छिंद्र साबळे, गटविकास अधिकारी, चांदवड.सकाळ+ चे सदस्य व्हा ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.