हर्शल गांगुर्डे : गणूर- कधीकाळी गावांचे वैभवशाली रक्षण करणाऱ्या, ऐतिहासिक वारसा सांगणाऱ्या चांदवडच्या वेशी आज नामशेष होण्याच्या उंबरठ्यावर आहेत. पूर्वीच्या काळी गावाच्या सीमारेषा स्पष्ट करणाऱ्या परकीय आक्रमणांपासून संरक्षण देणाऱ्या या वेशी आता विस्मृतीत जात आहेत. काही वेशी ढासळू लागल्या आहेत, काहींचे अस्तित्वच पुसले गेले आहे, तर उरलेल्या वेशीवर आज केवळ राजकीय बॅनर झळकत आहेत.