NSK26H31937
चांगदेव : मुक्ताईनगर तालुक्यातील श्रीक्षेत्र चांगदेव येथील हेमाडपंथी शिल्पकलेचा नमुना असलेले मंदिर.
----
NSK26H31938
चांगदेव मंदिर परिसरात तापी- पूर्णा या नद्यांचा संगम आहे. संगमाच्या ठिकाणी भाविक व पर्यटक मोठ्या संख्येने येतात आणि नौकाविहाराचा आनंद घेतात.
-----
NSK26H31939 (संदीप शिंपी)
----------
खानदेशातील पुरातन देवस्थान
---------------------------
श्री क्षेत्र चांगदेव
महाराष्ट्रात तापी-पूर्णा नद्यांच्या संगमामुळे नैसर्गिक सौंदर्याने नटलेल्या आणि संत चांगदेवांच्या चौदाशे वर्षे तपश्चर्यामुळे श्रीक्षेत्र चांगदेव हे खानदेशातील पुरातन देवस्थान म्हणून आणि पर्यटन स्थळ म्हणून प्रसिद्ध आहे. याठिकाणी अथांग जलाशय पुरातन मंदिर नैसर्गिक सौंदर्य यामुळे या स्थळी पर्यटकांसह भाविक वर्षभर भेटी देत असतात. याठिकाणी नौका विहाराची भुरळ पर्यटकांना पडते.
- संदीप शिंपी, चांगदेव (ता.मुक्ताईनगर)
संत चांगदेव मंदिर इसवी सन पूर्व ५०० म्हणजे २५०० वर्षांपूर्वीचे आहे. याठिकाणी पूर्वी दंडकारण्य होते. दंडकारण्यात तापी व पूर्णा या नद्यांचा संगम आहे. पूर्वी तापीला सूर्यकन्या व पूर्णा नदीला चंद्रकन्या म्हणून संबोधले गेले आहे. त्यामुळे ''तापी''चे पाणी गरम, तर ''पूर्णे''चे पाणी थंड आहे, या नद्यांच्या संगमावर अहिल्याबाई होळकर, सोमेश्वर महादेव यांची प्राचीन मंदिरे होती. आज फक्त सोमेश्वर महादेव मंदिर असून, अहिल्याबाईंचे मंदिर बुडाले आहे. चांगदेव महाराजांच्या मंदिराचे पूर्वीचे नाव ''सूर्यमंदिर'' असे होते.
आख्यायिका
या ठिकाणी श्री संत चांगदेव महाराजांनी कर्दळीच्या पानावर अवतार घेतला. त्यानंतर गुरुप्राप्त व ब्रह्मज्ञानप्राप्तीसाठी त्यांनी पृथ्वीला प्रदक्षिणा घातली. त्यामुळे ते परत ''सुंदर क्षेत्र भिन्नापूर'' म्हणजेच आजचे ''श्रीक्षेत्र चांगदेव'' येथे परत आले. त्यांना येथे श्री लक्ष्मी नारायण या उभयतांनी साक्षात दर्शन दिले. एके दिवशी ते अंघोळीला नदीवर गेले असता, त्यांनी परत येताना वाटीभर वाळू घेतली आणि या ठिकाणी असलेल्या मंदिरात आले. या ठिकाणी वाटी आणि वाळू असे वटेश्वर लिंग स्थापन केले. या वटेश्वर लिंगाची स्थापना करून त्यांनी तपश्चर्येस सुरवात केली. त्यांची तपश्चर्येची कालगणना ९८ वर्षांची असल्याची जेव्हा त्यांना यमदूत घ्यायला यायचा, त्या वेळी ते आपला आत्मा ब्रह्मांडात घेऊन जाऊन समाधीत मग्न असायचे. त्यामुळे यमाला त्यांचे प्राण हरण करता येत नसे व तो रिक्त हस्ताने परत जात असे. त्यांनी असे १४ वेळा यमाला परत पाठविले. १०० वर्षांची समाधी पूर्ण झाल्यानंतर पुन्हा समाधिस्थ होताना ते स्वतःचे नाव बदलत असत. वटेश्वर चांगा, चक्रपाणी चांगा आदी नावे त्यांची आहेत. वाळूपासून बनविलेल्या महादेवाच्या लिंगातून शंकर- पार्वती यांनी महाराजांना साक्षात दर्शन दिले. त्यामुळे या ठिकाणचे माहात्म्य वाढून ते तीर्थस्थळ बनले.
मंदिराचे बांधकाम :
चांगदेव महाराजांच्या मंदिराचे बांधकाम सहा महिन्यांच्या रात्रीमध्ये झाले, अशी आख्यायिका आहे. या मंदिराचा सभामंडप हा छत्तीस खांबांचा असून, त्या रात्री पूर्ण न होऊ शकल्याने अपूर्ण व ओपन परिस्थितीत आजही आहे. येथे लक्ष्मी नारायणाचे वहन असलेल्या गरुडाची मूर्ती असून, ती एकाच दगडाची आहे. तिची उंची जवळपास दहा फूट आहे. काही अपूर्ण राहिलेले बांधकाम होते, ते दगडाच्या शिलेत आहे आणि जे विटकाम दिसते ते शिवकालीन (३५० वर्षांपूर्वीचे) आहे. या मंदिराच्या विटा आजही पाण्यावर तरंगत असतात, हे विशेष. मंदिर हे ''द्रविड'' प्रकारचे आहे. या मंदिराच्या बाहेरील बाजूस १०१ मूर्ती कोरलेल्या असून उत्कृष्ट शिल्प कलेचे नयनरम्य दर्शन घडते ते फार विलोभनीय आहे. याला सूर्य मंदीर पण बोलले जाते कारण सकाळी सूर्य नारायण निघाले की मुर्तीवर सूर्य किरणे पडत असतात.
पर्यटकांना अनमोल पर्वणीची भुरळ :
तापी- पूर्णा नद्यांच्या अथांग जलाशयामुळे येथील परिसर विविध सौंदर्याने नटलेला आहे. संगमाच्या जलाशयात नौका नयनाचा आनंद येणाऱ्या प्रत्येक पर्यटक घेत असतो हा आनंद पर्यटकांना लुटण्यासाठी २० ते २५ नौका येथे नेहमीच सज्ज असून संगम दर्शनाचा लाभ पर्यटकांना देत आहेत. पर्यटकांना पोहण्याचा आनंद बाराही महिने घेता येतो.
सुविधा :
हे मंदिर पुरातत्त्व विभागाच्या ताब्यात असल्याने येथे मंदिर जीर्णोद्धार वेळोवेळी होत असतो. दोन नद्यांच्या संगमामुळे येथे नानाविध धार्मिक विधी होत असतात परंतु वर्षांपूर्वी येथे बांधलेला स्नान घाट दोन वर्षांपूर्वी पूर्णपणे ढासळलेला आहे. तसेच भाविकांच्या व पर्यटकांच्या वर्दळीमुळे येथे शौचालय आणि राहण्याची व्यवस्था नाही.स्नान घाट, भक्त निवास तसेच भोजनालय यासारख्या सुविधा पुरातत्त्व विभागामार्फत उपलब्ध करून देण्यात याव्यात अशी अपेक्षा पर्यटक आणि भाविकांमध्ये आहे.
----------