

सिन्नर- येत्या बुधवारी (ता. २६) महाशिवरात्रीला तालुक्यात विविध धार्मिक कार्यक्रम आयोजित केले असून, भाविकांकडून महाशिवरात्रीनिमित्त जय्यत तयारी सुरू आहे. सिन्नर येथे बारा ज्योतिर्लिंगे पुरातन काळापासून आहेत. यामध्ये गोंदेश्वर, ऐश्वर्यश्वर, पातळेश्वर, ब्रह्मेश्वर, सिद्धेश्वर, विठ्ठलेश्वर, चितळेश्वर, पांचाळेश्वर, नागेश्वर, तांबेश्वर, संगमेश्वर, मुक्तेश्वर, पंचमुख्येश्वर या बारा ज्योतिर्लिंगांचा समावेश आहे.