मध्यस्थी अंगलट आली; गाडी एकाची, मध्यस्थी दुसऱ्याची, मनस्ताप भलत्यांनाच | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

crowd during chaos

मध्यस्थी अंगलट आली; गाडी एकाची, मध्यस्थी दुसऱ्याची, मनस्ताप भलत्यांनाच

नाशिक : दुचाकी एकाची, पकडली दुसऱ्यांनी, त्यात मध्यस्थी तिसऱ्याची आणि मनस्ताप मात्र भलत्यांना, असा प्रकार मेहेर थांब्यावर नागरिकांनी अनुभवला. ग्रामीण भागातील आजारी महिलेला घेउन एक ग्रामीण भागातील व्यक्ती नाशिकला रुग्णालयात आले होते. तपासणीनंतर महिलेला तहान लागल्याने पुरुषाने अशोक स्तंभावर रस्त्यात दुचाकी लावून पाणी आणायला दुकानाचा रस्ता धरला. (chaos on road due to traffic jam nashik news)

एरवीही कधीही मेहेर थांब्यावरील गर्दीकडे कायम दुर्लक्ष करणारी वाहतूक शाखेची टोइंग गाडी नेमकी याच वेळी योगायोगाने घटनास्थळी आली. टोइंग गाडीवरील कंत्राटी कामगारांनी रस्त्यात लावलेली दुचाकी उचलून टोइंग ट्रकमध्ये कोंबायला सुरवात केली. हा सगळा प्रकार रस्त्यावरील उपस्थित पाहात होते. त्यातील अनेकांनी वाहतूक पोलिसांना, तसेच टोइंग कर्मचाऱ्यांना विनंती करीत आजारी महिलेला पाणी आणायचे म्हणून त्यांनी रस्त्यात दुचाकी लावल्याने त्यांना सोडून द्यावे, अशी पोलिसांकडे विनंती केली. हे सगळे सुरू असतानाच प्रकरणाने वेगळेच वळण घेतले.

गर्दीतील एक ‘अनाहूत' थेट पोलिसांच्या अंगावर गेला. तुम्हाला अमुक, तमुकच्या दुचाकी दिसतात का, असे म्हणत थेट वाहतूक पोलिसाला अद्वातद्वा बोलू लागला. आजारी महिलेची दुचाकी सोडून द्यावी एवढी साधी विनंती करण्यापुरता विषय असताना बोलता, बोलता त्या अनाहूताने त्याने पोलिसांवर बेछूट आरोप करायला सुरवात केली. इथपर्यंतही सगळे शांत होते. पण त्याने विषय थेट धर्मावर नेला. त्यामुळे ड्यूटीवर असलेला वाहतूक पोलिसही तापला. त्यानेही पोलिसांच्या कामावर शंका घेताच, वर जातीयवादी शब्दही वापरतात हे अजिबात सहन करणार नाही. शासकीय कामकाजात अडथळा आणला म्हणून तुमच्यावर कारवाई का करू नये म्हणून वरिष्ठ अधिकाऱ्याला बोलावून घेत प्रकरण पोलिसात नेण्याचा आग्रह धरीत सगळी वरात पोलिस ठाण्याकडे रवाना झाली.

हेही वाचा: बँक ऑफ महाराष्ट्र कर्जवाढीमध्ये सार्वजनिक बँक क्षेत्रात अव्वल!

काहींकडून व्हिडिओ शूटिंग

या सगळ्या प्रकारात मेहेर थांब्यावर पळापळ आणि धावाधावही झाली. त्यामुळे मोठी गर्दी झाली. टोइंग ट्रकही रस्त्यात असल्याने वाहतूकही खोळंबली. काही अनाहूतांनी शूटिंग सुरू केली. एकूणच गाडी ग्रामीण भागातील दाम्पत्याची कारवाई टोइंग कर्मचाऱ्यांची, मध्यस्थी पादचाऱ्यांची आणि मनस्ताप मात्र रस्त्यावरील नागरिकांना, असा रंजक प्रकार मेहेर थांब्यावर अनुभवास मिळाला.

हेही वाचा: मार्कंडेय पर्वताच्या पायथ्याशी भीषण अपघात; 6 जण जागीच ठार

Web Title: Chaos On Road Due To Traffic Jam Nashik News

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
टॅग्स :NashikTraffic
go to top