NMC Election : जानेवारीपासून सुरू असलेला घोळ अद्यापही कायम

NMC Election Latest Marathi News
NMC Election Latest Marathi Newsesakal

नाशिक : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी तीनऐवजी चार सदस्यांची प्रभागरचना जाहीर केल्यानंतर अद्यापही अधिसूचना न निघाल्याने संभ्रम कायम आहे. प्रशासनाने तूर्त जुन्या सूचनेनुसार काम करण्याचे थांबविले असले तरी नवीन प्रभागरचना संदर्भात सूचना असल्याने तूर्त जैसे थे परिस्थिती आहे. (chaos that has been going on since January is still going on NMC Election nashik Latest marathi news)

आगामी महापालिका निवडणुकीसाठी जानेवारी महिन्यापासून सुरू असलेला घोळ अद्यापही कायम आहे. ओबीसी आरक्षण, मराठा आरक्षण, प्रभागात नगरसेवकांची संख्या निश्चित करणे आदी कारणांमुळे निवडणूक प्रक्रिया लांबली. अखेर सर्वोच्च न्यायालयाने हस्तक्षेप करत दोन आठवड्यात निवडणुका जाहीर करण्याच्या सूचना दिल्या होत्या.

त्यानुसार लवकरच निवडणुका होतील, अशी अपेक्षा होती. मात्र, महाविकास आघाडी सरकारचा तीन सदस्यांचा निर्णय बदलत शिंदे सरकारने चार सदस्य प्रभागांची घोषणा केल्याने पुन्हा एकदा निवडणुका लांबताना दिसत आहे. राज्य निवडणूक आयोगाच्या सूचनेनुसार २९ जुलैपर्यंत आरक्षणाची प्रक्रिया पूर्ण झाली.

३ ऑगस्टपर्यंत आरक्षणावर हरकती व सूचना मागण्याची मुदत होती. ४ व ५ ऑगस्टला अंतिम आरक्षणाची यादी जाहीर करण्याच्या सूचना होत्या. मात्र, त्यापूर्वी राज्य शासनाने प्रभाग सदस्यांच्या संख्येत बदल केल्याने यापूर्वी राज्य निवडणूक आयोगाने केलेल्या सूचनेनुसार निवडणुकीची प्रक्रिया थांबविण्यात आली आहे.

NMC Election Latest Marathi News
तिसऱ्या श्रावणी सोमवारसाठी MSRTCतर्फे 230 बस

नवीन अधिसूचनेबाबत संभ्रम

पूर्वीची निवडणूक प्रक्रिया थांबविण्यात आल्यानंतर नवीन चार सदस्यांच्या प्रभागानुसार निवडणूक घेण्याची अधिसूचना निघणे अपेक्षित होते. मात्र, निर्णय होऊन आठ दिवस उलटत असतानाही अधिसूचना प्राप्त होत नसल्याने निवडणुकी संदर्भात संभ्रम कायम आहे.

राज्य सरकारच्या भवितव्याचा निर्णय ८ ऑगस्टला लागणार होता, मात्र सर्वोच्च न्यायालयाने १२ ऑगस्टपर्यंत सुनावणी लांबविली. त्यामुळे आदेश सूचनेचे भवितव्यदेखील लांबले आहे. मात्र, सरकारच्या या विलंबाच्या घोषणेमुळे प्रशासकीय कामकाजावर ताण होण्याबरोबरच राज्यात अराजकता निर्माण होत असल्याने नागरिकांमध्ये प्रचंड नाराजी आहे, तर इच्छुकांचा जीव टांगणीला लागला आहे.

NMC Election Latest Marathi News
पेव्हर ब्लॉक प्रकल्पाला अडचण कोणाची?

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com