ॲंकरसाठी बातमी...
चाळीसगाव ः वक्तृत्व स्पर्धेतील विजेत्यांसोबत विजयकुमार ठाकूरवाड, डॉ. मुकुंद करंबेळकर, सुजाता अवचट, राजेश ठोंबरे, भूषण पाठक, अण्णा धुमाळ आदी.
चाळीसगावला वक्तृत्व स्पर्धा उत्साहात
ऐश्वर्या पाटील व अनुषा अहिरे यांना प्रथम क्रमांक प्राप्त
सकाळ वृत्तसेवा
चाळीसगाव, ता. २ ः येथील शेठ नारायण बंकट वाचनालयाच्या यत्नदर्शिका विभागातर्फे घेण्यात आलेल्या स्वर्गीय देव आंतर महाविद्यालयीन व शालेय विद्यार्थ्यांसाठी स्वर्गीय प्रा. मंदाताई देव व डॉ. श्यामकांत देव स्मृती करंडक वक्तृत्व स्पर्धेत महाविद्यालय गटात ऐश्वर्या पाटील (एम. जे. कॉलेज जळगाव) तर शालेय गटात अनुषा संदीप अहिरे (डॉ. काकासाहेब पूर्णपात्रे विद्यालय, चाळीसगाव) यांनी प्रथम क्रमांक प्राप्त केला.
स्पर्धेचे उद्घाटन वाचनालयाचे अध्यक्ष डॉ. मुकुंद करंबेळकर यांच्याहस्ते झाले. यावेळी परीक्षक मुकेश पवार यांनी विद्यार्थ्यांना स्पर्धेच्या अटी व नियम समजावून सांगितल्या. या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन संचालक दीपक देशपांडे यांनी केले. उत्तर महाराष्ट्र विद्यापीठाच्या कार्यक्षेत्रातील जळगाव, धुळे, नंदुरबार या जिल्ह्यातील कनिष्ठ आणि वरिष्ठ महाविद्यालयातील विद्यार्थी व स्थानिक शाळेतील असे एकूण ४४ विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला होता. बक्षिस वितरण सोहळ्याला उपविभागीय पोलिस अधिकारी विजयकुमार ठाकूरवाड प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते. समितीचे निमंत्रण प्रा. मधुकर कासार यांनी प्रास्ताविक केले. परीक्षक श्रद्धा देशपांडे, आनन शिंपी व मुकेश पवार यांनी मनोगतातून विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले. स्पर्धेच्या प्रायोजक सुजाता अवचट (छत्रपती संभाजीनगर) यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले. विजयकुमार ठाकूरवाड यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले. डॉ. मुकुंद करंबेळकर यांनी अध्यक्षीय मनोगत व्यक्त केले. स्पर्धेचा निकाल ग्रंथपाल ग्रंथमित्र अण्णा धुमाळ यांनी जाहीर केला.
स्पर्धेचा निकाल
महाविद्यालयीन गट ः प्रथम- ऐश्वर्या पाटील (एम. जे. कॉलेज, जळगाव), द्वितीय- दीपश्री साळुंखे (जुलालसिंग राठोड विद्यालय, चाळीसगाव), तृतीय- चेतना हिरे (पाचोरा), उत्तेजनार्थ- ईश्वरी दीक्षित (एम. जे. कॉलेज), तेजस लोहार (मणियार महाविद्यालय) व विश्वास सूर्यवंशी (राष्ट्रीय महाविद्यालय). शालेय गट ः प्रथम- अनुषा अहिरे (डॉ. काकासाहेब पूर्णपात्रे माध्यमिक विद्यालय), द्वितीय- हर्षदा पाटील (डॉ. काकासाहेब पूर्णपात्रे माध्यमिक विद्यालय), तृतीय- हर्षदा उदावंत (आ. बं. मुलींचे हायस्कूल), उत्तेजनार्थ- अनन्या पाटील, अक्षदा भोईटे, श्रावणी दाभाडे व अर्णव उपासनी यांना देण्यात आले. सर्व विजेत्यांचा रोख रकमेची बक्षिसे व प्रमाणपत्र देऊन गौरव करण्यात आला. ज्येष्ठ साहित्यिक विश्वास देशपांडे यांनी सूत्रसंचालन तर वाचनालयाचे कार्यवाह राजेश ठोंबरे यांनी आभार मानले. वाचनालयाचे उपाध्यक्ष भूषण पाठक, सहकार्यवाह मिलिंद देव, संचालक प्रितमदास रावलानी, प्रकाश कुलकर्णी, प्रा. दीपक शुक्ल, सुबोध मुंदडा, रजनी बुंदेलखंडी आदी उपस्थित होते.
--------------------------