फोटो : NSK26H31877, NSK26H31878
नंदुरबार : नेटबॉल क्रीडा स्पर्धेत जिल्हास्तरावर विजयी झालेला चावरा पब्लिक स्कूलच्या मुलांचा आणि मुलींचा संघ.
---
चावरा स्कूलचे नेटबॉलमध्ये दुहेरी यश
मुला-मुलींच्या संघाची जिल्हास्तरीय स्पर्धेत बाजी
सकाळ वृत्तसेवा
नंदुरबार, ता. ११ : येथील चावरा पब्लिक स्कूलच्या १४ वर्षांतील मुलांच्या व मुलींच्या संघाने जिल्हास्तरीय शालेय नेटबॉल क्रीडा स्पर्धेत विजय मिळविला. हा संघ आता नाशिक विभागीयस्तरीय नेटबॉल क्रीडा स्पर्धेत जिल्ह्याचे प्रतिनिधित्व करणार आहे.
क्रीडा व युवक सेवा संचालनालयांतर्गत जिल्हा क्रीडाधिकारी कार्यालय, जिल्हा क्रीडा परिषद व नंदुरबार नेटबॉल असोसिएशन यांच्या संयुक्त विद्यमाने झालेल्या या स्पर्धेत जिल्ह्यातील दहा संघ सहभागी झाले. स्पर्धेत चावरा पब्लिक स्कूलच्या मुली- सानिका पाटील, प्रिंसी लालवाणी, अनया पाटिल, अर्पिता कुमारी, ईशानवी, खुशी वाधवाणी, आराध्या कुंवर, जानवी पाटील, जिया दातानी, मोक्षदा मोरे आणि मुले- जिग्नेश खांडेकर, आर्यन थोरात, हितार्थ पटेल, हार्दिक चौधरी, कनिष्क वाडिले, विधान जैन, खुशवर्धन गिरासे, निनाद होडगर, वंश जैन, दक्ष वाधवा, साहस पाटील या खेळाडूंनी यश संपादन केले.
संबंधित संघ आता नाशिक विभागास्तरावर जिल्ह्याचे प्रतिनिधित्व करणार आहे. क्रीडाशिक्षक योगेश मोरे, प्रशांत शिंदे, खुशी देसले यांचे विद्यार्थ्यांना मार्गदर्शन लाभले. शाळेचेे संचालक फादर टेनी फरक्का, प्रशासक फादर सिजिन, मुख्याध्यापिका सिस्टर जेस्लिन व ब्रदर रोहित यांनी खेळाडूंचे कौतुक केले.