चेंबूरमधून अपहरण झालेल्या अल्पवयीन मुलीची नाशिकरोड रेल्वेस्थानकातून सुटका।

चेंबूरमधून अपहरण झालेल्या अल्पवयीन मुलीची नाशिकरोड रेल्वेस्थानकातून सुटका।
Published on: 
चेंबूरमधून अपहरण झालेल्या मुलीची नाशिक रोड रेल्वेस्थानकातून सुटका; संशयित ताब्यात सकाळ वृत्तसेवा नाशिक,ता.१२ : मुंबईतील चेंबूर येथून अल्पवयीन मुलीचे ३१ ऑक्टोबरला अपहरण करण्यात आले होते. अपहरण करण्यात आलेली अल्पवयीन मुलगी नाशिक रोड रेल्वेस्थानक परिसरात असल्याची माहिती गुन्हे शाखा अंबड युनिट ३ च्या पथकास मिळाली. ठिकाणी त्वरित कारवाई करत तिची सुखरूप सुटका केली. संशयीतासही ताब्यात घेतले असून पुढील कारवाईसाठी त्याला चेंबूर पोलिसांच्या ताब्यात दिले. तक्रारदार यांच्या अल्पवयीन मुलीला अज्ञात व्यक्तीने फूस लावून पालकांच्या कायदेशीर ताब्यातून पळवून नेल्याचा प्रकार ३१ ऑक्टोबरला घडला होता. चेंबूर पोलिस ठाणे येथे गुन्हा दाखल करण्यात आला होता. दरम्यान, अपहरण झालेली मुलगी नाशिक रोड रेल्वेस्थानक परिसरात असल्याची माहिती पोलिस उपनिरीक्षक मोतीलाल पाटील यांना मिळाली. माहितीच्या आधारे गुरुवारी (ता.१२) रोजी वरिष्ठ निरीक्षक जगवेंद्रसिंग राजपूत, हवालदार प्रकाश बोडके, योगेश चव्हाण, भूषण सोनवणे, अंमलदार राजेश महाले, महेंद्र दोंदे, गौरव धात्रक, चारुदत्त निकम, हर्षल जाधव, अरुण चव्हाण आणि सविता कदम यांच्या पथकाने रेल्वेस्थानक परिसरात सापळा रचला. अपहरण झालेल्या मुलीची ओळख पटवून महिला पोलिस कर्मचाऱ्यांच्या मदतीने तिची सुखरूप सुटका करण्यात आली. याप्रकरणी प्रशांत ऊर्फ रवी गायकवाड (वय ३४, रा. शांतिनिकेतन चाळ, रूम क्रमांक १६, विनोद शुक्ला हायस्कूलजवळ, पोस्टल कॉलनी, चेंबूर, मुंबई) याला ताब्यात घेण्यात आले. संशयित विवाहित असून, त्याने अल्पवयीन मुलीला फूस लावून आणि आमिष दाखवून पालकांच्या कायदेशीर ताब्यातून पळवून नेल्याचे प्राथमिक प्राथमिक माहिती तपासात समोर आले आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.