चेतक फेस्टिवलमध्ये यंदा महिलांसाठी स्वतंत्र ‘चेतक महिला कक्ष’

चेतक फेस्टिवलमध्ये यंदा महिलांसाठी स्वतंत्र ‘चेतक महिला कक्ष’
Published on: 
(टुडे पान एक ॲन्कर) -------- फोटो : NSK26H34686 नंदुरबार : चेतक महिला समिती पदाधिकाऱ्यांच्या नियुक्तीप्रसंगी उपस्थित चेतक फेस्टीवलचे अध्यक्ष जयपालसिंह रावल समवेत महिला समितीच्या अध्यक्षा ऐश्‍वर्या रावल, मेघा खारकर व पदाधिकारी. --------- सारंगखेड्यात ‘चेतक फेस्टिवल’मध्ये होणार नारीशक्तीचा जागर चेतक महिला समितीची स्थापना; अध्यक्षपदी ऐेश्‍वर्या रावल सकाळ वृत्तसेवा वडाळी, ता. ७ : देशभरात प्रसिद्ध असलेल्या सारंगखेडा (ता. शहादा) येथील एकमुखी दत्त यात्रोत्सवाच्या निमित्ताने आयोजित चेतक फेस्टिवलमध्ये यंदा प्रथमच महिलांसाठी स्वतंत्र ‘चेतक महिला कक्ष’ सुरू करण्यात येणार आहे. महिलांच्या कलागुणांना वाव देण्यासाठी तसेच त्यांच्या सहभागातून विविध सांस्कृतिक, मनोरंजनात्मक आणि ज्ञानवर्धक उपक्रम राबविण्याच्या उद्देशाने चेतक महिला समितीची स्थापना करण्यात आली आहे. या समितीच्या माध्यमातून महिलांसाठी स्वतंत्र कार्यक्रमांचे आयोजन करण्यात येणार असून, त्यासाठी फेस्टिवलकडून स्वतंत्र व्यासपीठ उपलब्ध करून दिले जाणार आहे. याबाबत जयपालसिंह रावल म्हणाले, सारंगखेडा येथील एकमुखी दत्त यात्रेने देशाच्या कानाकोपऱ्यात आपली वेगळी ओळख निर्माण केली आहे. यात्रेचे हे वैशिष्ट्यपूर्ण स्थान कायम राखतानाच त्यात अधिक विविधता आणणे, पारंपरिकतेचे जतन करणे आणि ज्ञान, मनोरंजन व विज्ञानाची ग्रामविकासाशी सांगड घालणे, हा या उपक्रमामागील मुख्य उद्देश आहे. महिलांच्या सहभागातून यात्रोत्सवाच्या आकर्षणात आणखी भर पडणार असल्याचे त्यांनी सांगितले. २३ डिसेंबरपासून एकमुखी दत्त यात्रोत्सवाला प्रारंभ होत आहे. या पार्श्वभूमीवर यंदापासून चेतक महिला समिती स्थापन करण्याचा निर्णय घेण्यात आला. महिलांनी महिलांसाठी विविध कार्यक्रमांचे आयोजन करावे, यावर बैठकीत चर्चा करण्यात आली. महिलांना आपले विचार मांडता यावेत. कलागुणांचे सादरीकरण करता यावे आणि विविध क्षेत्रांत आपली प्रतिभा दाखवता यावी, यासाठी ‘महिला कट्टा’ हे स्वतंत्र व्यासपीठ उपलब्ध करून देण्यात येणार आहे. चेतक फेस्टिवलमध्ये महिलांसाठी स्वतंत्र विभाग कार्यरत करण्यात येणार आहे. या उपक्रमामुळे यात्रोत्सवात महिलांचा सहभाग वाढण्यास मदत होणार आहे. सांस्कृतिक कार्यक्रमांसह सामाजिक, शैक्षणिक आणि मनोरंजनात्मक उपक्रमांच्या माध्यमातून महिलांना एकत्र आणण्याचा प्रयत्न समितीच्या माध्यमातून केला जाणार आहे. कार्यक्रमांची रूपरेषा निश्चित करण्यासाठी बैठकीत चर्चा करण्यात आली. कार्यकारिणीत यांचा समावेश जयपालसिंह रावल यांच्या हस्ते चेतक महिला समितीच्या पदाधिकाऱ्यांची नियुक्ती करण्यात आली. यात अध्यक्षपदाची धुरा ऐश्वर्या रावल यांच्यावर सोपविण्यात आली आहे. तर कार्यक्रम प्रमुख म्हणून मेघा खारकर यांची निवड झाली आहे. उर्वरित कार्यकारिणीत उपाध्यक्ष सीमा पाटील, सचिव योगिता राजपूत, योगिनी वाघ, सदस्य ज्योती सूर्यवंशी, वैशाली निकम, उमा मोरे, मंदाकिनी निकम, योगिता पाटील, करिष्मा महाले, ऋतिका गिरासे, दीपिका मिस्तरी, प्रियंका राजपूत, नलिनी पाटील, प्राजक्ता सूर्यवंशी, माधुरी मोरे आदींचा समावेश आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.