ठरलं! 3 ते 5 डिसेंबरला होणार 94 वे अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन

marathi sahitya sammelan
marathi sahitya sammelanesakal
Updated on

नाशिक : 94 वे अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन हे नाशिककरांचे व्हावे, यादृष्टीने संयोजकांकडून प्रयत्न सुरू होते. साहित्य रसिकांना संमेलनाच्या तारखा व संमेलन कुठे होणार, याची उत्सुकता लागून होती. आता त्याला पुर्णविराम मिळाला असून संमेलनाचे पदाधिकारी व साहित्य रसिकांना सोयीच्या तारखा असाव्या यातून निर्णय घेऊन जिल्ह्याचे पालकमंत्री व संमेलनाचे स्वागताध्यक्ष छगन भुजबळ (Chhagan Bhujabal) यांनी साहित्य संमेलन हे 3 ते 5 डिसेंबरला होईल अशी अधिकृत घोषणा केली, तर संमेलन हे भुजबळ नॉलेज सिटीमध्ये होणार असल्याची माहिती संमेलनाचे निमंत्रक जयप्रकाश जातेगावकर यांनी दिली.

संमेलनाच्या तारखा सर्वांना सोयीच्या

संमेलन भुजबळ नॉलेज सिटीमध्ये घेण्याबाबत संयोजकांनी महामंडळाला कळविले होते. भुजबळ नॉलेज सिटीमध्ये घेतल्यास संमेलन खर्चात बचत होईल, असे संयोजकांचे म्हणणे होते. त्यानुसार संमेलनाध्यक्ष ज्येष्ठ विज्ञान साहित्यिक जयंत नारळीकर (Jayant Narlikar), साहित्य महामंडळाचे अध्यक्ष प्रा. कौतिकराव ठाले-पाटील (kautikrao Thale Patil) यांसोबत सर्वच पदाधिकारी व साहित्य रसिकांना सोयीच्या तारखा असाव्या यातून निर्णय घेऊन जिल्ह्याचे पालकमंत्री व संमेलनाचे स्वागताध्यक्ष छगन भुजबळ यांनी साहीत्य संमेलनासाठी 3 ते 5 डिसेंबर या तारखांची अधिकृत घोषणा केली.

marathi sahitya sammelan
"सत्तर वर्षात झाले नाहीत त्याहून अधिक डॉक्टर्स होतील दहा वर्षात तयार"

कोरोना नियमावलीचे तंतोतंत पालन

कोरोना नियमावलीचे तंतोतंत पालन करता येईल अशी सज्जता भुजबळ नॉलेज सिटीमध्ये असल्याने त्यादृष्टीने विचार केला असून संमेलनादरम्यान कोरोनाच्या सर्व शासकीय नियमांचे पालन करण्यात येईल अशी माहिती यावेळी संमेलनाच्या पदाधिकाऱ्यांकडून देण्यात आली. संमेलनाच्या नियोजनासाठी ४० समित्या गठित करण्यात आल्या आहेत. संमेलन यशस्वितेसाठी आपल्या समितीने केलेल्या पूर्वतयारीचा आढावा, पुढील नियोजन, तसेच यापूर्वी कामात आलेल्या अडचणींची आढावा बैठक घेतली गेला. त्यात समित्यांच्या कामकाजाचा आढावा घेऊन संमेलनाचे सूक्ष्म नियोजनावर भर दिला असून, त्याद्वारे संमेलन यशस्वी होण्यासाठी सर्वस्तरावर प्रयत्न केले जात आहेत.

marathi sahitya sammelan
शाळाबाह्य विद्यार्थी शोधण्यासाठी ‘बालरक्षक ॲप’

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com