Chhagan Bhujbal : छगन भुजबळांचा वाढदिवस 'ज्ञानाच्या भेटीचा उत्सव'; फुलांऐवजी पुस्तके भेट देण्याचे आवाहन!
Chhagan Bhujbal’s Birthday to be Celebrated with Simplicity : राज्याचे अन्न, नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण मंत्री छगन भुजबळ यांनी त्यांच्या १५ ऑक्टोबरच्या वाढदिवसानिमित्त 'ज्ञानाच्या भेटीचा उत्सव' उपक्रमांतर्गत फुलांचे गुच्छ किंवा शाल न आणता पुस्तके भेट देण्याचे आवाहन केले असून, ही सर्व पुस्तके ग्रामीण भागातील वाचनालयांना दान करण्यात येणार आहेत.
नाशिक: राज्याचे अन्न, नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण मंत्री छगन भुजबळ यांचा वाढदिवस १५ ऑक्टोबरला असून तो साधेपणाने साजरा होणार आहे. वाढदिवसानिमित्त वाचन संस्कृतीच्या जनजागृतीसाठी ज्ञानाच्या भेटीचा उत्सव साजरा करण्यात येणार आहे.